गुरुवार, १६ जुलै, २०२०

प्रिय शिरीन....



प्रिय,
शिरीन.
विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???"

प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत नाही. पण यामुळे माझं प्रेम काही कमी झालं नाही आणि होणार ही नाही. मी आईला आणि बाबांची परवानगी मागितली आहे, आपल्या लग्ना बद्दल पण अजूनही त्यांनी होकार दिलेला नाही आहे. आज पुन्हा मी घरातील सर्व वरिष्ठ मंडळी सोबत माझ्या लग्नाचा विषय काढणार आहे. मला तुझ्या कडून शेवटचं उत्तर हवं आहे, की तू लग्नासाठी तयार आहेस की नाही.

शिरीन तुला आठवत असेल आपण काढलेले ते फोटो त्या मध्ये आपल्या मागील आठवणीतले फोटो बघत बसलो होतो. तुझ्या चेहऱ्यावरील ते हास्य आजही तसच डोळ्यात भरलेलं आहे. मला तुझ्या पासुन लांब जायचं नाही आहे. तु माझ्यासाठी तुझं घर सोडून येशील त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःच्या घराची तयारी करावी लागेल. त्यामुळे मी ज्यादा काम करत आहे जेणेकरून पैसे जमवून आपण स्वतः एक घर घेऊया ज्यामध्ये तु आणि मी आपलं सर्वस्वी जग असेल. मला कळत नाही की मी योग्य निर्णय घेत आहे की नाही कारण शिरीन मला तुझ्यापासून वेगळं होता येणार नाही. तुझ्या शिवाय आयुष्याच्या वाटेवर मी एकटा प्रवास करू शकत नाही कारण माझ्या जगण्याचं ध्येय तुच आहेस. पण मी माझ्या आई वडिलांना वृद्धापकाळात एकट्याला जगण्यासाठी सोडू शकत नाही माझ्याच नाही तर तुझ्या आई बाबांच्या साठी माझ्या मनात तितकाच आदर आणि प्रेम आहे. आणि जेव्हा त्यांना आपली गरज असेल तेव्हा आपण त्यांच्या सोबत नसणार हे योग्य वाटत नाही. म्हणुन तु तुझ्या आई वडिलांना माझ्या बद्दल कळव मी माझ्या आई वडिलांना तुझ्याबद्दल कळवतो.लवकरच उत्तर येईल अशी अपेक्षा करतो.

शिरीन आज पुन्हा तु दिलेल्या पत्रांच्या ढिगाऱ्यात पाहिले पत्र सापडले ती तारीख तो वार आणि तो क्षण जशास तसा डोळ्यासमोर उभा राहिला. तुला आठवत असेल कसा मी रेल्वे स्थानकावर तुझी वाट बघत उभा होतो. तुला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झाले होते. तु एक एक पायरी चढत येताना माझ्या हृदयाच्या ठोक्यानी जोर धरला होता. तु हळू हळू वर चढत येत होतीस, परंतु माझं हृदय त्याच्या चार पटीने जोरात धडकत होत. आजही तो अनुभव वेगळाच वाटतो. तुझ्या चेहऱ्यावर एक तेज होत. कदाचित ते मला पाहण्यासाठी असावं. त्यानंतर ट्रेन मध्ये तुझा हात हातात घेऊन चढताना आपलेपण वाटत होतं. ते सतत अनुभवावस वाटत. तुझं ते नाक मुरडन आजही आठवलं की चेहऱ्यावर खुदकन हसु येत. तुझ्या आणि माझ्या उंचीतील फरक जेव्हा तु मला दाखवत आणि माझ्या कडे वर तोंड करून बघत असायची तो क्षण मी माझ्या डोळ्यात भरून ठेवला आहे आणि कायमस्वरूपी तो माझ्या मनावर उमटून राहील. शिरीन आता हा दुरावा सहन होत नाही मला तुझ्या मिठीत मारायचं आहे.

आज पुन्हा त्या आठवणी जिवंत झाल्या. लवकरच तुला भेटायला येईन. तुझी खुशाली कळव. तु काळजी घे स्वतःची वेळेवर जेवत जा. आई बाबांना माझा नमस्कार कळव.

फक्त तुझा,
-मितेश


बुधवार, १५ जुलै, २०२०

तु आलास की...




तु आलास की ।
दरवळतो तो मातीचा सुगंध।।

तु आलास की ।
बहरतात झाडे झुडपे।।

तु आलास की ।।
घेतो सुटकेचा श्वास।।

तु आलास की ।
भिरभिरते किलबिलाट पाखरांची ।।

तु आलास की ।
लागते चाहूल गारव्याची।।

तु आलास की ।
धन्य होतो माझा राजा शेतकरी।।

तु आलास की।
मेघ गरजतात छान ।।

तु आलास की ।
भागते तहान आणि नदी नाले छान।।


तु आलास की ।
आगमनाची आतुरता लागते बाप्पाची।।

तु आलास की ।
तु आलास की ।।



सोमवार, ६ जुलै, २०२०

अर्धवट....



पहिल्यांदा पाहताच कुणी प्रेमात पडत का??
हा प्रश्न मी नेहमी स्वतःला विचारत असतो आणि त्याच उत्तर नकळत कधी सापडत सुद्धा नाही.
 कारण मला माहीत आहे मी प्रेमात पडलो होतो.
कामावरती पहिला दिवस नेहमी सारखाच घरातून डब्बा घेतला आणि चालत निघालो आणि कंपनीच्या दारावर सुंदर देखणी ती उभी होती. कुणाची तरी वाट बघत असावी. आणि नेहमी प्रमाणे मी गेट मधून आत जाण्या आधीच तिने आवाज दिला.
अहो!!!!!! तिने आवाज दिला
माझ्या मनात कॅडबरी चे दोन्ही लाडू एकत्रच फुटले.
नकळत गुलाबाचं फुल उमगलं. कदाचित क्षणिक असेल पण तो क्षण मनाला मोहनारा होता.
मी उत्तर दिलं "बोला"!!!
"आज माझा कामावर पहिला दिवस आहे आणि आत कशी जाऊ हे काही कळत नाही 
भीतीने हात पाय गार पडलेत तुम्ही मला आत पर्यंत सोबत याल का"??? तिने मला विचारलं
हे वाक्य ऐकून मी स्वप्नात तर नाही ना असा भ्रम पडला सकाळी उठून अंघोळ तर केली होती पण स्वप्नात सुद्धा एवढा भयंकर प्रसंग कधी घडला नव्हता.
मी मिलिंद स्टोर मॅनेजर आहे. इथे "मी" ओळख करून दिली.
मी प्राजक्ता रिसेप्शन डेस्क साठी आले आहे.
तिला बघताच मी तिच्या प्रेमात पडावं हा मोह आवरेना मला.
तीच शब्दात वर्णन करण्यायोग्य ती नाहीच मुळी, 
गोरी गोरी पान, हिरव्या पैठणीच्या कापडाने शिवलेला चुडीदार ड्रेस, कानात घंटी असलेले लांब कानातले, उजव्या हाताला अडकवलेली नवीन कोरी पर्स, डाव्या हातात प्लास्टिक ची पिढवी पोटाला धरून, माथ्यावर लाल गंध, आणि मखमली ओठावर साजेल अशी लिपस्टिक, आणि कोवळ्या कोवळ्या पायात नवीन अशी सँडल. अश्या रुपात कोण भुलणार नाही सांगा.
मी तर पाहता क्षणीच भुललो. 
ओळख झाल्यानंतर प्राजक्ताला विचारलं इथं पर्यंत कसे आलात???
"बाबा सोडून गेले" तिने उत्तर दिलं.

कंपनीतल्या दोन चार मुलींच्या सोबत तिची ओळख करून दिल्या नंतर प्राजक्ताचा एकटेपणा कमी वाटू लागला. पण माझा आणि तिचा जेवायला जायचं वेळ ठरलेला असायचा आधी मी एकटा जेवायला जायचो पण जेव्हा पासून प्राजक्ता माझ्या आयुष्यात आली आणि माझं उभं आयुष्य बदलून टाकलं.
दुपारी दोन च्या सुमारास दररोज एकत्र जेवायची सवय एक दिवस मी डब्बा नाही आणला आणि जेवायला जायची इच्छा नसल्याने कामात गुंतून राहिलो. तिने १० मिनीटे वाट बघिल्यानंतर मला शोधत शोधत माझ्या स्टोर पर्यंत येऊन पोहचली. 
मी तिला बघताच शब्द निघेनासे झाले.
चला जेवायला मी केव्हाची वाट बघत बसले तिकडे???? प्राजक्ताने कठोर आवाजात विचारलं.
मला काही उत्तर सुचल नाही.
डब्बा नाही आणला मी!!!
चला मी आणलाय आपण जेऊया. अस म्हणून माझ्या हाताला धरून तिने मला ओढत कँटीन मध्ये घेऊन गेली.

पुरण पोळ्या आणल्या होत्या माझ्यासाठी आणि मी आज डब्बा आणायला विसरलो होतो.
संपूर्ण कंपनी मध्ये चर्चा रंगली होती आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि त्या चर्चे मधला सार मला आवडत होता. मला प्राजक्ता आवडत होती. मला तिने जगण्याची उमेद दाखवली होती. आयुष्यात कुणासाठी तरी जगावं अशी ती होती.
तिच्या सोबत जगताना आपल्या आयुष्यात दुःख नाहीच असा भास होत असायचा पण कदाचित क्षणिक असावा.
मला पुरण पोळ्या चारत असताना तिने विषय काढला.
आई बाबानी माझ्या साठी मुलगा बघितला आहे. सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कामाला आहे ५०-६० हजार रुपये पगार आहे. आणि मला सुद्धा तो आवडतो. तू माझा जिवलग मित्र आहेस मला काही सुचेनासे झाले आहे.

पुरण पोळीचा अर्धा घास तोंडात आणि अर्धा घास हातात. तिच्या चेहऱ्यावर जराशी पण चिंता दिसत नव्हती पण माझ्या चेहर्यावर बारा मात्र नक्की वाजले होते. तिने एवढा मोठा निर्णय मला सांगण्यामागचं कारण काय असाव हे मी जाणून घेण्याआधीच निथुन निघालो.
दुसऱ्या दिवशी सुट्टी होती विचार केला की सोमवारी भेटून तिला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगून टाकेन कारण वेळ हातात होती.
सोमवारी कंपनीच्या दरवाज्यावर वाट पाहिली पण प्राजक्ता काही आली नाही.
मला वाटलं लग्न ठरलं म्हणून तिने कदाचित नोकरी सोडली असावी म्हणून मी पण तिला विसरण्याच्या मार्गावर निघालो . पण राहून राहून तिने दिलेल्या प्रेमळ आठवणी सतत डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या म्हणून कंपनीच्या क्लर्क ला सांगून पत्ता मिळवला. 
उद्या सुट्टी घेऊन तिच्या घरी जायचं ठरलं. सकाळी नित्यनेमाने कार्यक्रम पार पाडून निघालो. 
तिच्या दारात मांडव घातला होता.  वाटलं लग्नासाठी घातला असावा. मनात हूर हूर वाढत होती पाऊले जड होत होती तरीही तिच्या दाराजवळ पोहोचलो. पण तिथे वेगळंच दृश्य होत. कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. मी एका काकुला विचारलं काय झालं इथे???.
काकूने उत्तर दिलं 
प्राजक्ता गेली!!!!!!!!!!
माझ्या पायाखालची जमीन हादरली. डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी खाली कोसळलो. तिच्या बाबांनी घरातून पाणी भरून तांब्या आणला आणि माझ्या डोळ्यातील अश्रुधारा सुरू झाल्या. मी काय बोलू आणि कशी सुरुवात करू मला काही सुचेना.
तिच्या बाबांना विचारलं नक्की त्रास काय होता तिला???
त्यांनी उत्तर दिलं "कंपनीत एका मुलावर प्रेम होतं तिचं"
बस एवढं ऐकून कान शांत पडले.



©-मितेश

शनिवार, ४ जुलै, २०२०

स्वप्न नगरीचा राजा

स्वप्न नगरीचा राजा



"चल चल आवर पटा पट" !!!! - स्वराताई...
काय झाल? झोपू देना मला !!!! - नितीन...
अरे दादा उठ बाबा बघ काय करत आहेत .

बाबानी सगळं समान इकडे तिकडे पसारा मांडला होता. मला नक्की कळत नव्हतं काय चालू आहे. ते मी डोळे चोळत अंथुरणात बसलो, बाबांना बघत नक्की करत काय आहेत बाबा???

मी नितीन वय वर्ष ७ इयत्ता २ री (ब) जिल्हा परिषद शाळेत शिकतो. स्वराताई माझी मोठी बहीण इयत्ता ५ वी मध्ये शिकते माझ्याच शाळेत आणि विठ्ठल माझे बाबा महार गावात कुठं जनावर मृत पावल किंवा कुठ गटार तुंबली की गावकरी बाबांना प्राधान्य द्यायचे
" फाटक पिवळे धोतर आणि मळकटुन मातीच्या रंगाचा सदरा, पायात चप्पल नावाची गोष्ट कधी मिळाली नाही, टाचांना भल्या मोठ्या मोठ्या चिरा पडलेल्या आणि सतत कुणाकडे तरी काहीतरी काम मिळेल अशी आशा ठेवणारे माझे बाबा".
 अस आमचे तिघा जणांचे कुटुंब आई काळाच्या ओघात केव्हा निघून गेली काही कल्पना नाही कधी गेली कशी गेली कुठे गेली पण बाबा दररोज सांगतात 
"आभाळात ती चांदणी दिसते का? जी खुप जास्त लखलखते तीच तुझी आई कायम तुला बघत असते-(बाबा बोलत होते)”
बाबा!!! 
आई रात्र झाली का दिसते?
 दिवस भर मला बघायला सुद्धा येत नाही मी एकटाच असतो दिवस भर माझ्यासोबत कुणी बोलत सुद्धा नाही स्वराताई पण तिच्या मैत्रिणींच्या सोबत खेळत असते मला खेळायला कुणी घेत सुद्धा नाही.

काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे, आणि या वर्षी मी बाबांना सांगणार आहे, आपल्या घरी बाप्पा घेऊन या म्हणून पण बाप्पा ला आणले की, 
बसवायचे कुठे मी एकटाच विचार करत होतो!!.
"नारळाच्या झावळ्यानी बनवलेलं जेमतेम १० X १० च माझं घर असावं आणि त्यात शेणाने सारवलेल".
 घरात एकही टेबल नाही घरात देव्हारा नाही एक छायाचित्र खराब झालेला फोटो होता, त्यात कोणते देव होते हेही कळत नव्हते पाण्याने त्यातील चित्र पुसट झाले होते मी बाबांना नेहमी म्हणायचो बाबा हे कोणते देव बाप्पा आहेत. तेव्हा बाबा उत्तर द्यायचे हे "गणपती बाप्पा" आहेत.
आता गणपती बाप्पा कोण हे कुणाला माहीत नसावेत लहानपणापासून प्रत्येकाला माहीत असत गणपती बाप्पा कोण आहेत. जेव्हा पण गणपती येतात तेव्हा असा काही जल्लोष प्रत्येक घरा घरा मध्ये असतो की सगळी कडे एक मन प्रसन्न करणार वातावरण निर्माण झालेलं असत. 
सगळीकडे सुगंधी अगरबत्तीचा सुगंध आणि गाण्यांच्या जल्लोषात सर्व गणेश जयंती साजरी करत असतात आणि या वर्षी मी सुद्धा बाबांना आग्रह करणार आणि गणपती बाप्पाला घरी घेऊन येणार 

मी-बाबा आपल्या घरी गणपती बाप्पा घेऊन या ना??????
मला बाप्पा बरोबर खेळायचं आहे!!!!
माया अक्का बोलते, बाप्पा ला घेऊन आला की बाप्पा ला सांग तू तुझ्या आईला बोलवून आणेल.

"स्वरा" माझी ताई आणि आई दोन्ही सकाळी उठल्यापासून मला कडपे घालून नाष्टा चारून डब्बा बनवून देऊन माझ्या शाळेत सोडे पर्यंत स्वराताई नुसती माझी "आई" झालेली असते. ताईने कधी मला आईची कमतरता भासू दिली नाही, पण शेजारील मुलांच्या आई बघून मला आई पाहिजे असायची. पण ताई मला तिच्या पोटच्या मुला सारखी सांभाळत होती ताईने कधीच मला रडवल नाही. पण जेव्हा केव्हा मी राडायचो तेव्हा ताई मला खुदकन हसवायची जस की तिला माझ्या प्रत्येक गोष्टीच गुपित ठाऊक होतं. 
बाबांना माहीत होतं आपला मुलगा हट्टी आहे.
बाबा घेऊन या ना बाप्पा ला…
स्वराताई बाबांना सांग ना मला बाप्पा पाहिजे!!! 
 म्हणून त्यांनी होकारार्थी मान डोलावली पण बाबांना माहीत होतं आपली परिस्थिती खुप बिकट त्यात गणपती येणार म्हटल्यावर खर्च आला खिशात जेमतेम ५ रुपये आणि पावसाने लावलेली छतावरून गळती अश्या गळती मध्ये बाप्पा कसे घेवून येणार, पण कदाचित बाबांची सुद्धा इच्छा होती की बाप्पा घेऊन यायचेच यावेळी.
 सकाळी सकाळी सरपंचाच्या माणसाने निरोप आणला "विठ्ठल!! चल सरपंचांनी बोलावलंय
सरपंचांनी २ रुपयांच्या बोलीवर बाबांना एक एकर शेतीत लावणी करिता बोलवलं पैसे कमी होते पण बाबांना सध्या पैसे पाहीजे होते दोन्ही मुलांच्या अपेक्षा २ रुपयांच्या साठी एक एकर शेती लावत होते आणि आम्ही दोघे आनंदाने भरून आलो होतो.
स्वराताई समजूतदार आणि हुशार होती तिला बाबांचं दुःख त्रास वेदना कळून येत होत्या दररोज बाबा एक वेळ जेवून आम्हाला दोन वेळ पुरेल अस वागत होते स्वरा ताई सतत माझी समजूत काढत असायची पण मी बालिश वृत्ती चा असल्यामुळे मला फारसे काही कळत नसायचे. 

लवकरच गणेश चतुर्थी जवळ येत होती. बाबानी संपूर्ण घरात शेण सावरले होते स्वरा ताईने बाबांना खुप मदत केली होती. पण अजूनही काही तयारी झाली नव्हती. बाबांना त्यांच्या समाजातील काही लोक आवडे लावत होते की महार गणपतीची पुजा करत नाहीत. पण बाबांनी सुद्धा हट्ट धरला होता यावेळी कितीही अडचणी आल्या तरी गणरायाचे आगमन करायचेच. 
शेवटी तो दिवस आलाच. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि मी  आणि स्वराताई घरीच होतो. बाबांनी स्वराताईला सांगितले की, मी गणरायाची मुर्ती आणायला जातोय आणि बाबा निघून गेले.

स्वराताईने प्रसादाची उत्तम सोय केली. शिरा बनवला होता आणि मी आतुर झालो होतो की बाबा कधी येतील. मी सतत स्वराताईला विचारत होतो, ताई बाबा कधी येतील???
स्वराताई सतत मला सांगत होती, नितु बाळा येतील बाबा लवकरच येतील.
मी आज नवीन शर्ट घातला होता. बाबांनी मागच्या वर्षी दिवाळीला घेतला होता आणि शाळेची चड्डी आणि पावडर लावून तयार होतो. पण बाबा काही येईना. सकाळची दुपार झाली. शिरा पुर्ण थंड झाला होता. मला भूक सुद्धा लागली होती पण स्वराताईने सांगितले होते की, जोवर बाप्पा येऊन जेवत नाही तोवर आपण उपास करायचा असतो. सात वर्षाच्या मुलाला उपास वैगेरे काय माहीत असणार???
इतक्यात
बाबा आले !!!
 बाबा आले !!! 
मी इतका खुश झालो की माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण बाबांच्या हातात मुर्ती काही दिसेना. बाबांच्या हातात एक चौकीनी वस्तू वर्तमानपत्रात गुंडाळून घेऊन येत होते.माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव तयार झाला होता. तेवढ्यात बाबा दारात आले. स्वराताईने बाबांच्या पायावर पाणी ओतले आणि त्यांना घरात घेतले. 

मी उड्या मारत होतो स्वरा ताई म्हटली अरे थांब थांब 
बाबा मुर्ती कुठे आहे???
 बाबा सांगा ना बाबा????
"अरे राजा, मुर्ती नाही मिळाली" बाबांनी उत्तर दिले
म्हणून मी गणरायाचे छायाचित्र आणलं आहे. आपल्या देव्हाऱ्यात जे बाप्पा आहेत ते खराब झाले आहेत ना म्हणून मग मी हे घेऊन आलो.
मी पूर्णपणे नाराज झालो होतो. सर्वांच्या घरात मोठं मोठया गणरायाच्या मुर्त्या पाहून मला वाटले बाबा सुद्धा एखादी मोठी मूर्ती घेऊन येतील. पण बाबांनी मला दिलेला शब्द पाडला नाही.
बाबांनी आणि मी अगदी मूर्तीची जशी  तशी त्या छायाचित्राची प्रतिष्ठापना केली. त्या नंतर आरती सुरू झाली की तेवढ्यात शेजारील तीन चार मुले आरती चा आवाज ऐकून घरात आली आणि ती सुद्धा आरती म्हणू लागली माझ्या आनंदाला पुर आला होता. नकळत माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू निघू लागले होते. स्वराताईने सर्वाना तिने बनवलेला शिरा प्रसाद म्हणून दिला. स्वराताईने याआधी कधीही इतका स्वादिष्ट शिरा बनविला नव्हता. 
मी स्वराताईला विचारलं, 
स्वराताई तू नेहमी असा शिरा का नाही बनवत???
तेव्हा स्वराताईने उत्तर दिलं की, जेव्हा आपला प्रसाद बाप्पाच्या चरणी पोचतो तेव्हा त्या प्रसादा मध्ये एक वेगळाच गोडवा निर्माण होतो.
बाबांनी सांगितलं की, पहिल्या वर्षी बाप्पा दीढ दिवस वास्तव्य करतात. आपण सुद्धा असच करूया.
बाबांनी मुर्ती आणायला जातांना गावातील पुजाऱ्यांचा सल्ला घेतला होता. त्यांनी दिलेला सल्ला संपूर्ण गावं पाळत असायचं. आम्ही रात्र भर खेळ खेळत होतो. तेव्हा झुगार नावाची गोष्ट कळत सुद्धा नव्हती. आम्ही दिवटीच्या प्रकाशात जे सोपे खेळ खेळता येईल तसे मला तर काही कळत नसायचं पण कच्चा लिंबु म्हणुन मला स्वरा ताई आणि बाबा दोघे पण घेत होते.
सकाळी उठून मी असाच बाप्पा चा फोटो न्याहाळत होतो "तेव्हा स्वराताई म्हटली,
नितु कसे आहेत बाप्पा??"
मला हुंदका येत होता, डोळ्यांतून नकळत अश्रू निघाले.
आणि स्वराताईने मला जवळ घेत, माझ्या डोक्यावर मायेचा हाथ फिरवत म्हटले, "आपण दरवर्षी या बाप्पाचे पुजन करूया आणि असेच त्यांचं प्रेमाने स्वागत करूया

©-मितेश






बुधवार, ३ जून, २०२०

तुम्हाला माहीत आहे का???

तुम्हाला माहीत आहे का??
आपण शाळेत पाहिलेला पृथ्वीचा गोळा तिरकस का असतो?
चला तर या विषयावर आपण थोडक्यात माहिती घेऊ.
"तुम्हाला माहीत असेलच जसे चुंबकाला दोन ध्रुव असतात. तश्याच काही आपल्या पृथ्वीला देखील आहेत. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आणि पृथ्वी तिच्या उत्तर ध्रुवा कडून Image
२३.५° अंश झुकलेली आहे. त्याच कारण म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे असणारे वजन आहे म्हणजे उदा; डिंकाचा गोळा आपण हतावर गोल केला आणि त्याला हवेत उडवला असता. तो कोणत्याही एका बाजूने अंडाकार फिरतो तसेच काही पृथ्वीसोबत घडत पृथ्वी सुद्धा एक गोळा(उल्कापिंड)आहे तिचा आकार अंडाकार आहे. Image
पण हा अनुभव आपल्याला सूर्याकडून येणाऱ्या किरणांकडून येतो. त्या मुळे जेव्हा उत्तर ध्रुवावर उष्णता जास्त असते तेव्हा त्याच्या विरुध्द बाजूस तितकीच थंडी असते. म्हणजेच उत्तरेला उन्हाळा असला की दक्षिणेला हिवाळा असतो.पृथ्वी सध्या प्रमाणात घटत आहे. म्हणजेच Image
पर्यावरणामुळे घट झाल्याने अधिक थंड उन्हाळे आणि उबदार हिवाळ्यासारखी अवस्था होऊ शकते. तर तिरपे वाढल्याने जास्त तीव्र गरम उन्हाळा आणि थंडी थंडी निर्माण होऊ शकते.वर्षानुवर्षे आपण अनुभवत असलेले जागतिक तापमान याला कुठेतरी हाच जबाबदार आहे.आपल्या पृथ्वीच्या बाबतीत हा बदल Image
खूपच लहान आहे.
शाळेत असताना खुप वेळा प्रश्न पडला होता की पृथ्वी नक्की अशी का आहे??

पण कुठेतरी सर्वात जास्त बेजबाबदार आपण सुद्धा आहोत. आपण झाडे तोडून टाकली, नद्या प्रदूषित केल्या, समुद्र दूषित केले कशासाठी स्मार्ट होण्यासाठी पण या कारणाने पृथ्ववरचे कित्येक प्राणी नाहीसे झाले Image
कित्येक प्रजाती संपुष्टात आल्या आणि अजूनही माणसाला अक्कल आलेली नाही तो स्वतः स्मार्ट झाला खरा पण निसर्गाचा चक्र बिघडवत गेला
अजूनही वेळ गेली नाही
पावसाळा सुरू होतोय प्रत्येकाने एक झाड नक्की लावा आणि त्याला जगवा जास्त नाही प्रत्येकाने फक्त एकच झाड लावा
बघुया Image
पुढील २० वर्षात सर्वांना कळेल की या वर्षी देशाची लोकसंख्या किती होती
प्रत्येकाच्या नावे एक झाड म्हणजे देशात कधीच शेतकरी राजा दुःखी होणार नाही आणि आपण कधी तहानलेले राहणार नाही
सर्व जगातून लोक येतील भारतातील हिरवळ पाहायला 
धनयवाद 🙏🏻
©मितेश कदमImage

बुधवार, २७ मे, २०२०

कोरोना एक अविशाप

नमस्कार,
मी एक सामान्य समाज सेवक आणि आमची आई अंगणवाडी मध्ये मागील २५ वर्ष झाले सेविका म्हणून कार्यरत आहे त्यादिवशी केंद्र सरकार कडून आलेले धान्य वाटप करण्यासाठी मी आणि आई अंगणवाडी मध्ये गेलो २३ एप्रिल रोजी सदर महिला आमच्या संपर्कात आली आणि २५ एप्रिल रोजी सदर महिला कॉविड १९ पॉझिटिव्ह आली

त्यामुळे २६ तारखेला मला आणि माझ्या परिवाराला ऐरोली येथील महानगरपालिका इस्पितळात चाचणी करण्यासाठी सकाळी ९ च्या सुमारास नेण्यात आले सोबत एकूण २७ संशयित आणि ७ लहानमुले असे सर्व शेजारील लोक होते ऐरोली च्या इस्पितळात नेताना सर्व लोक सर्कस मधील जनावरांना नेताना जसा आनंद घेत होते आणि मोबाईल काढून व्हिडीओ काढत होते माझ्या जीवाला चटका लागला आपण समाजासाठी एवढे जीवापाड मदत करतो पण त्याच्या मोबदल्यात अशी परत फेड मिळते असो. त्यानंतर आमच्या सर्वांच्या चाचण्या घेत ४ वाजले तिथे ना पाण्याची सोय नाही जेवणाची सोय सर्व लहान मुले भुकेने कळवळत होती तिथल्या काही अधिकाऱ्यांनी कळवलं की विलगीकरण कक्षात पोचल्यावर तुम्हाला जेवण देण्यात येईल त्यानंतर १४ वर्षाच्या लहान मुलांच्या सोबत एक पालक वाशी येथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आणि बाकीचे २० सांशीयीत पनवेल येथील इंडिया बुल्स विलगीकरण कक्षात एकाच अँबुलन्स ने नेण्यात आले सदर अँमबुलन्स ची क्षमता ४ संशयित नेण्याची असताना त्यात वडाप भरल्या सारखे भरगच्च २० व्यक्ती कोंबण्यात आले सायंकाळी ५ च्या सुमारास पनवेल येथील विलगीकरण कक्षात पोहचविण्यात आले सकाळ पासून सर्व संशयित उपाशी काहीही न खाता आणि पिता या आशेत होते की लवकरच काहीतरी खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी पाणी मिळेल काही तासांनी मी तेथील कर्मचाऱ्यांना विचारपोस केली असता लवकरच काहीतरी देण्यात येईल अशी आशा दाखविण्यात आली परंतु रात्रीचे ९ वाजले परंतु पाणी सुद्धा मिळाले नाही जसे कारागृहात कैद्यांना बसवले जाते तसेच काही आमच्या सोबत देखील घडले इमारतीच्या एका कोपऱ्यात सर्व संशयित बसून होते ४ तासानंतर एका कर्मचाऱ्यांची नजर पडली त्याने आश्वासन दिले की लवकरच तुम्हाला खोली आणि जेवणाची सोय केली जाईल अशी आशा दाखवली रात्रीचे १० वाजले ५ तासानंतर सुद्धा पाणी नाही जेवण नाही भुकेने पोटात गोळा येत होता सदर वागणुकीने त्रस्त होऊन मी पुन्हा त्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांचे उत्तर माझ्या कानातून रक्त येण्यासारखं होत "इतक्या लवकर काही मिळणार नाही तुम्ही काही आमदार खासदार नाही किंव्हा आमचे कुणी नातेवाईक नाहीत की तुम्हाला इथे पाहुणचार मिळेल आणि असच १४ दिवस कुत्र्यासारखा राहण्याची तयारी ठेवा" आणि "तुम्हाला कुत्र देखील विचारणार नाही अशी उत्तर मिळत होती" तेव्हा आमच्या सर्वांच्या आशा एकाच व्यक्तीकडे होत्या तो म्हणजे तेथील पोलीस निरीक्षक माझे वडील पोलीस बांधवाकडे मदत मागण्यांसाठी त्याच्याकडे गेले असता त्याने वडिलांना शिवीगाळ करत म्हणाला "म्हाताऱ्या तिकडे लादिवर झोप नाहीतर एक खानाखाली देईन" असे उत्तर जेव्हा माझ्या कानी पडले तेव्हा माझा पारा चढला काय करू काय नको असे झाले होते आपण ज्यांना आपले रक्षक म्हणतो तेच आपले भक्षक असतात हे त्यावेळेस मला कळलं आपण त्यांना आपले मित्र म्हणतो आपले रक्षक म्हणतो परंतु दुर्दैवाने ते त्यातले नाहीत हे त्यादिवशी स्पष्ट झाले आणि मी ट्विट करण्याचा निर्णय घेतला रात्री १०:१५ च्या सुमारास मी ट्विट केलं की
""'' मागील १३ तासापासून आम्ही उपाशी आहोत आम्हाला नाही पाणी मिळाले आहे आणि नाही जेवण खोली मिळण्याची सुद्धा आशा नाही आहे माझे आई वडील वयस्क आहेत त्यांची दुरवस्था होत आहे आई एक स्त्री असल्याने त्यांना होणारा त्रास काही सहन होत नाही"""" जमल्यास आपली मदत मिळावी सदर ट्विट करताच ट्विटर वरील #मायमराठी कुटुंबातील सर्व सदस्य ट्विट चा पाठपुरावा करत मदतीचा हात मागत होते त्या एका ट्विट ला खुप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सर्व जनतेकडून आणि राजकारणातील नेत्यांच्या कडून मदतीचे हात हाथ पुढे येऊ लागले
तिथे एकूण दहा इमारती होत्या प्रत्येक इमारत २९ मजली प्रत्येक मजल्यावर एकूण ३० खोल्या होत्या अश्या एकूण दहा इमारती होत्या त्यापैकी तीन इमारती मध्ये आधीच काही संशयित ठेवण्यात आले होते आणि दहा पैकी दोन इमारती पॉझिटिव्ह रुग्णांकरिता ठेवण्यात आल्या होत्या.
त्या नंतर मध्यरात्री ११:४० च्या सुमारास खोली मिळाली प्रत्येकाला स्वतंत्र खोली देण्यात आली परंतु अजूनही पाणी आणि भुकेने व्याकुळ झालेले पोट काही ऐकत नव्हते तेव्हा माझे बोलणे नुकतेच नवी मुंबई कमिशनर सोबत झाले होते की लवकेच जेवण मिळेल कारण माझ्या ट्विटला सर्वानी पाठिंबा दिल्या नंतर १२.१५ च्या सुमारास जेवण मिळाले पण पाणी पिण्यासाठी वापरलेल्या मोकळ्या बाटल्या दिल्या आणि सांगितले एक पाणी पिण्याची मशीन आहे त्यातून सर्वानी पाणी भरावे एका मजल्यावर ३० खोल्या आणि एक पाणी भरण्याचे मशीन अश्याने सामाजिक अंतर कसे पाळावे हा मोठा मुद्दा होता त्यानंतर सर्वानी ट्विटला दिलेल्या प्रतिसादाने रात्र भर राजकारणी लोकांचे फोन सुरू झाले ""मी मदत करतो - मी मदत करतो"" माझे आभार व्यक्त कर माझे नाव ट्विट कर असे अनेक फोन आले राष्ट्रवादी, काँग्रेस , मनसे कार्यकर्त्यांनी फोनचा रात्रभर पाऊस पाडला. त्यानंतर पहाटे ३ च्या सुमारास नवी मुंबई पोलीस कंट्रोल रूम मधून फोन आला की तुम्ही दिल्ली ला तक्रार केली आहे परंतु वास्तविक मी कुठेही तक्रार नोंदवली नाही मी केलेल्या ट्विट मध्ये जनतेने इतक्या प्रमाणात सर्व राजकीय शासकीय त्यानंतर बातमीदार सर्वांना गुंतवले होते की सर्वांनी मला फोन केले आणि पोलीस मला जाब विचारत होते ते मदतीच्या हेतूने बोलत होते की दमदाटीच्या हेतूने बोलत होते हे काही कळेना दिवस भर उपाशी पोटाने त्रास दिला होता आणि आलेला थकवा काही थांबत नव्हता त्यानंतर पोलिसांनी पहाटे ४-५ च्या सुमारास पोलिसांची एक तुकडी पाठवली माझ्या मदती करीता आणि मला खाली बोलवण्यात आले त्यांनी विचारपोस केली तक्रार करण्याचे कारण काय आम्ही इथे आहोत वर पर्यंत तक्रार का केली असा जाब विचारत होते परंतु जेव्हा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीचा हात मागितला तेव्हा ते केकसत होते आणि नंतर आलेले पोलीस कर्मचारी आम्ही आहोत ना वर पर्यंत तक्रार का केली हा जाब विचारत होते नक्की सामान्य माणसाने करायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यानंतर काही त्रास असल्यास आम्हाला मदत माग वर पर्यंत तक्रार जाता कामा नये असे ठासून सांगितले. सकाळी आणखी काही वरिष्ठ मंत्र्यांच्या ऑफिसातून फोन आले आम्ही मदत करू असे आश्वासन देण्यात आले परंतु खोली मध्ये अत्यावश्यक वस्तूंची सोय नव्हती(उदा; पाण्याची बदली, झोपण्यासाठी बेड, उशी, पिण्यासाठी पाणी, जेवणासाठी थाळ्या, इ.)त्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागला त्यानंतर पहिला दिवस उजाडला सकाळचे १० वाजून गेले नाष्टा आणि चहा सुद्धा आला नाही आदल्या दिवशी उपाशी पोटाने हाल केले आणि आजची परिस्थिती सुद्धा सारखीच असेल का या भीतीने लोक खोलीत बसून होते. दुपारी १२.१० च्या सुमारास कंत्राटी कामगार चहा देण्यासाठी आला परंतु चहा घेण्यासाठी ग्लास घरून घेऊन यायचे असते असे तेव्हा कळले त्या नंतर दुपारी जेवणाची वाट बघत सायंकाळ उजाडली सायंकाळी ४.४५ च्या सुमारास जेवण आले त्यावेळी कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता तुम्ही आला आहात याची त्यांना कल्पना नव्हती त्यामुळे जेवण दिले नाही अशी बाब समजली आणि तोही दिवस निघून गेला तो वनवसातील पहिला दिवस होता त्यानंतर जे काही लोक माझ्या संपर्कात आले होते ते
स्वार्थी लोक सतत फोन करत होते त्यांना माझ्या प्रकृती बद्दल चिंता नव्हती तर काही व्यक्तींच्या संपर्कात मी आलो असल्यानं त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती परंतु चाचणीचे अहवाल कधी मिळतील याची कल्पना कुणालाही नव्हती तिसऱ्या दिवशी अत्यावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले तोवर ओंजळीने अंघोळ करण्याचा लाभ घेतला आणि लादिवर झोवण्याचा अनुभव असल्यामुळे ते काही जड गेले नाही चौथ्यादिवशी अहवाल येतील अशी आशा देण्यात आली होती परंतु अहवाल काही आले नाही परंतु पाचव्या दिवशी आमच्या सोबत आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे सर्वांच्या मनात भीतीने घर केलं कारण चाचणी घेतल्यानंतर आम्ही सर्व २० संशयित एकत्र एकाच गाडीने आलो होतो त्यामुळे नवी मुंबई चे नोडल ऑफिसर आणि कमिशनर यांना ई मेल द्वारे पत्र दिले की आमच्या सर्वांची दुसरी चाचणी त्वरित घेण्यात यावी परंतु त्यावर विचार करावा लागेल असे उत्तर त्यांच्या कडून मिळाले त्यामुळे अस्वस्थता वाढली त्या नंतर त्याच रात्री आईची प्रकृती खालावली आणि माझ्या मनात भीतीने घर केलं मी कावरा बावरा झालो होतो जेव्हा वेळ आपल्यावर येत तेव्हा खर दुःख कळत ही खोटी गोष्ट नाही त्यानंतर मी थेतील डॉक्टर यांची मदत मागितली असता त्यांनी मला ऑनलाईन तक्रार करा अशी माहिती मिळाली त्यानंतर मी ऑनलाईन वेबसाईटवर नवी मुंबई मुख्य कार्यालयातील संपर्क शोधला आणि त्वरित त्यांना फोन केला रात्री १२ ते १ च्या सुमारास डॉ. उज्वला ओतुर्कर या कार्यरत होत्या मी आजही त्यांच्या कार्याला सलाम करतो एक स्त्री असूनही त्या रात्री रुग्णांच्या सेवे करीता रुजू होत्या यांनी त्वरित इंडिया बुल्स पनवेल येथील डॉक्टरांना फोन करून साहाय्य करण्याचे आदेश दिले आणि मला त्वरित मदत मिळाली त्यांचे आभार मी आयुष्यात कधी विसरणार नाही आणि त्यांनी आश्वासन दिले की आणखी काही मदत लागल्यास नक्की कळवा अशी विनंती केली
२ तारखेला आलेल्या अहवालात सदर व्यक्ती पॉझिटिव्ह आला त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले नव्हते किंवा इतर काही औषध उपचार सुद्धा सुरु करण्यात आले नव्हते त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्ती मानसिक दबावाखाली आला होता त्याला ५ वर्षाची लहान मुलगी त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर जबाबदार कोण असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता त्यावर असे उत्तर मिळाले की आम्ही मोजकेच अधिकारी कुठे कुठे पाहणी करणार परंतु सतत पाठपुरावा घेत असल्यामुळे अखेर ६ दिवसानी त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह आरक्षित इमारती मध्ये हलविण्यात आले परंतु १४ दिवस उलटून गेले तरीही दुसरी चाचणी घेण्यात आली नाही तेव्हा मी तेथील अधिकारी आणि डॉक्टर यांना जाब विचारला असता टोलवा टोलवीची उत्तर मिळाली परंतु सोबतच असे काही व्यक्ती आले की जे तिथे २८ दिवसा पासून विनवणी करत होते की केव्हा त्यांना सोडण्यात येईल बाकी सर्व बेलापुर, नेरुळ, घणसोली, तळवली, ऐरोली दिवा गाव येथील संशयित असून काहींना १४-१८-२२-२८ दिवसापासून तेथेच अडकून होते परंतु जेव्हा जेव्हा ते जाब विचारायला जात असत त्यांना हुरकवून लावण्यात येत होते परंतु ९ तारखेला सर्वांचा प्रतिक्षेचा बांध तुटला आणि १०० ते २०० व्यक्ती खाली उतरले आणि त्या जमावाने अधिकाऱ्यांना धारेवर धरले आमच्या पैकी अर्धे इमारतीच्या खिडकीतून तमाशा बघत तसेच होते मी त्वरित नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना फोन करून सूचना दिली त्यानंतर पोलीस आयुक्त तेथे आले येताना त्यांनी स्वतःचा फौज फाटा घेऊनच आले जसे की आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार आहोत परंतु मी आणि माझ्या सोबतच एक युवक होता आम्ही दोघांनी त्याच्या सोबत चर्चा केली त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली तेव्हा त्यांनी आश्वासन दिले की आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत घरी सोडण्यात येईल तेव्हा सर्वानी सुटकेचा श्वास घेतला आणि आप आपल्या खोलीत निघून गेले परंतु दिलेल्या आश्वासन नक्की खरे आहे का यावर मनात शंका निर्माण झाली परंतु संध्याकाळी अचानक ७ च्या सुमारास लोकांची झुंबड उडाली घरी जाण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या घरी जाण्यासाठी आतुर होता आणि गाड्यांची व्यवस्था कमी असल्याने काही लोकांना दुसऱ्या दिवशी सोडण्याचा निर्णय घेतला ८ च्या सुमारास काही इमारतीच्या दरवाज्याला टाळा लावण्यात आला कारण खुप मोठ्या प्रमाणात लोक घरी जाण्यासाठी निघाले होते आणि तिथे सोशल डिस्टन्स चे पार बारा वाजवले होते लोकांनी तरीही आम्ही विचार केला की एवढ्या गर्दी मध्ये घरी जाण्यापेक्षा एवढे दिवस थांबलो तर आणखी एक दिवस थांबुयात परंतु तेवढ्यात एक व्यक्ती माझ्या मजल्यावर सांगण्यास आला की ज्यादा गाड्या सोडत आहे जर तुम्हाला घरी जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही खाली जाऊ शकता तेच रात्री ११ च्या सुमारास खाली गेलो असता तेव्हा चित्र वेगळंच पाहायला मिळालं २० ते २५ डॉक्टरांची फौज तैनात होती मागील १४ दिवसात एकही डॉक्टर नजरेने दिसला नव्हता रुग्णांची चाचणी सुद्धा कंत्राटी असलेले कामगार घेत होते आणि आज निघायच्या वेळी एवढी फौज दिसणे आश्चर्यच होते आणि काही अक्कल शून्य माणस पालिकेने दिलेल्या अत्यावश्यक वस्तू म्हणजेच बादल्या,चादर,जेवणाची ताटे घरी घेऊन चालली होती तेव्हा माझा पारा चढला आणि त्यांच्या सोबत वाद सुद्धा झाला की प्रशासन तुमच्या सोई साठी वस्तू देत आहे घरी नेण्यासाठी नाही काही सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी वस्तू तिथेच ठेवून दिल्या पण त्याआधी बऱ्याच लोकांनी वस्तू पळवल्या सुद्धा आपणच जर आपल्या प्रशासनाला लुबाडले तर नक्कीच तोटा आपलाच आहे हे लोकांना कधी कळून चुकेल देव जाणे
मागील १४ दिवस नक्कीच वनवासात काढले काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या त्यामुळे काही गोष्टी कथे मध्ये नमूद केल्या नाही आहेत
जर प्रत्येकाला आपली जबाबदारी कळली तर नक्कीच असे दिवस कुणाच्या वाट्याला येणार नाहीत आणि शत्रूच्या वाट्याला सुद्धा असे दिवस येऊ नये अशी प्रार्थना करेन पण खर सांगायचं झालं तर एका विषाणूने माणसातला खरा स्वार्थी माणूस दाखवून दिला प्रत्येक जण स्वार्थी असतो हे कळवून दिले कोण आपलं जिवलग नाही सगळे स्वार्थासाठी जन्माला आले आहेत मित्र नाही आणि मैत्रीण सुद्धा नाही एकटे आलो एकटेच जाणार आहोत हे नक्की आहे


एका मायक्रो कोरोना विषाणूमुळे माणसातल्या खऱ्या स्वार्थी जाती दाखवल्या
कोण आपले आहेत कोण परके हे कळवून देण्यासाठी कोरोना जन्माला आला असावा त्याने जेवढं नुकसान केलं त्या पेक्षा जास्त अनुभव दिला कदाचित पुढे यापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होणार असावी त्यामुळे ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी आताच घात केला म्हणजे यापुढे प्रत्येकाने माणसे जोडा पण त्याच्या आधी त्यांची परीक्षा घ्या त्यानंतरच जवळ करा कदाचित आजवर तुम्ही खुप माणसं जोडली असतील पण तुम्हाला कोरोना झाल्यावर ते तुम्हाला काळजी घे अशी मनस्थिती देण्यापेक्षा तू माझ्या संपर्कात का आला? हा प्रश्न विचारतील कारण त्यांना केलेल्या मदतीची किंवा त्यांच्या मैत्रीची जाणीव नसावी अशी माणसं आज उपयोगी नाही आली तर आयुष्याच्या शेवटी कशी उपयोगी येणार पण मी एवढे मित्र मिळाळवले ज्यांनी मला आजवर पाहिलं सुद्धा नसावं त्यांनी फोन करून एवढ्या मानसिकते मध्ये उभं केलं की आम्ही आहोत आपण जगाला हरवू शकतो हा तर इवलासा कोरोना आहे अश्या परिस्थिती मध्ये आर्थिक नाही तर मानसिक धीर देणारे हात हवे असतात
अजून वेळ चुकलेली नाही अनुभव घ्या मैत्रीतील कोरोना ओळखा आणि सावध व्हा

घरी रहा, सुरक्षित रहा

©️ मितेश कदम

ती निर्भया...

आजवर लहान मुलींवर लहानपणी त्यांच्या आयुष्याचा खेळी केली जाते आणि ते कोणी बाहेरचे नाही तर घरातीलच नराधम असतात सध्या त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे विश्वासाने जगावं तरी कसं हा मोठा प्रश्न आज अशीच एका निर्भयाची कथा सतर्क राहण्यासाठी मांडत आहे कृपया याचा कथेचा वेगळा अर्थ काढू नये.  मुलगी म्हटलं की सर्व पुरुषांच्या नजरेत भरते ती सुंदर अशी कामुक स्त्री तीच स्त्री लहान असताना गोड गोंडस अशी गुबगुबीत परी अश्याच एका मुलीचा जन्म झाला सर्व परिवारात आनंदाच वातावरण होत तिच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुलगी झाल्यावर बर्फी वाटतात त्याने संपुर्ण इस्पितळात पेढे वाटले होते. खुपच सुंदर क्षण होता तो त्या आई साठी आणि त्या वडिलांच्या साठी. लवकरच तिचे बारसे झाले नाव नियती(काल्पनिक) ठेवण्यात आलं असे सुंदर नामकरण करण्यात आले हळू हळू नियती मोठी होत होती तिचे ते बोबडे बोलणे, तुरु तुरु चालणे एक नवलच असते. तिचा तिच्या वडिलांवर खूपच जीव होता आणि प्रत्येक मुलीचा तिच्या आई पेक्षा वडिलांवर खुप प्रेम असत करण प्रत्येक मुलगी तिच्या बाबांच्या साठी ही परी पेक्षा कमी नसते . नियती आता शाळेत जात होती तिला तिचे बाबा दररोज शाळेत सोडायला जायचे आणि आई रंजना (काल्पनिक) शाळेतून घरी आणायची.हा नित्याचा कार्यक्रम असायचा..


नियतीचे बाबा तिला प्रत्येक रविवारी बागेत खेळायला घेऊन जायचे. आज रविवार होता नियती सकाळ पासून बाबा उठा ना बागेत जायचं आहे किती वेळ झोपणार आज मला सुट्टी आहे शाळेला तुम्ही दर रविवारी असेच करता उशिरा उठता आणि मला संध्याकाळी बागेत घेऊन जाता मला खेळायला मिळतच नाही. शेवटी बाबा उठले त्यांच्या नियती चे ऐकून नियती तिच्या घरात जाऊन भांडी घेऊन आली खेळायला तोवर बाबा अंघोळीला निघून गेले बाबांना माहीत होतं खेळण्यात मग्न झाली की दुपार उलटून जाईल तोवर माझी कामे उरकून घेतो असेच काही घडले पण आज रंजनाच्या माहेरून फोन आला संध्याकाळी जेवायला या जावईबापू बाबांनी नक्की केलं आणि नियती ला
आवाज दिला
नियती मामाच्या घरी जायचं आहे !!!!
येणार ना????
नियतीने उत्तर दिले हो!!!!
बाबा टला जाऊया लगेच
आता नाही रे बाळा संध्याकाळी बाबांनी दिलेलं उत्तर बाबा मग आज बागेत नाही जायचं का????
नाही म्हणून बाबा निघून गेले अंघोळीला नियती पुन्हा खेळण्यात मग्न झाली बाबांनी आई ला सांगितले तुझ्या माहेरून फोन आला होता संध्याकाळी जेवायला या म्हणून आपल्याला जायचं आहे दुपारी निघुयात दुपार झाली नियती तयार झाली आणि आई च्या मागे लागली आई आवर ना ग पटकन मामाच्या घरी जायचय ना.... झालं ग बाई तुला नेहमी घाई असते बाबा चल ना रे हो बाळा कपडे तरी घालू दे मला बाबांनी उत्तर दिलं नियती रुसून बाहेर पायरी वर जाऊन बसली जेमतेम ६ वर्षांची गोरी गोरी पान , फुलांच्या सारखे मखमली गाल, डोळे निळसर घारे, डोक्यावर दोन पोनी बांधलेल्या,डोळ्यांवर केस येऊ नये म्हणून बँड लावलेला त्यावर सुंदर दोन फुलपाखरं बसलेली,खांद्याला पर्स अडकवलेली, जांभळा सफेद फ्रॉक, ओठांना गुलाबी रंगाची लिपस्टिक, कपाळाला सुंदर टिकली , आणि पावडर भरभरून लावलेली मुलींना लहानपणापासूनच सुंदर दिसण्याचा मोह असतो. लवकरच ते सर्व गाडीने निघाले नियती बाबांच्या पुढे बसली ती पर्स सतत खांद्यावरून पडत होती बाबांनी सांगितलं बाळा ती आई कडे दे ती ठेवेल जपून नको ना बाबा तरीही बाबांनी फी काढून रंजनाच्या हातात दिली थोड्याच वेळात ते रंजनाच्या माहेरी पोचले तिथे मुलगी आणि नात येणार म्हणून तयारी चालू होती जेवणाची नियती तिथे पोचल्या पोचल्या आज्जी ने उचलून घेतलं चार पाच मुके घेतले तेव्हा आज्जीला बर वाटल म्हातारी माणस नातवंडं बघून खुप आनंदी होतात एक वेगळाच मोह असतो.


बाबा, सासरे बुवा, रंजना आणि नियती जेवायला बसले जेवून झालं की सर्व गप्पा मारत बसले नियती ची बागेत खेळायची वेळ होती तिचे खेळ चालूच होते या घरातून त्या घरात हे समान काढ ते समान काढ नियती ला बाबा ओरडले काय ग कशाला समान काढतेस परत आणणार नाही तुला इकडे आणि कुठे नेणार सुद्धा नाही नियती रागात वरच्या खोलीत गेली तिथे गौरव बसला होता मोबाईलमध्ये अश्लील विडिओ बघत नियतीने आवाज दिला मामा... मी इथे खेळू का???? त्याने उत्तर दिले हो खेळ गौरव चा फाजिल पणा सुरूच होता तो एकटक विडिओ बघत होता तर एकटक नियतीला पाहत होता कुठे तरी त्याच्या मनातली काम वासना त्याला उनवत होती काही वेळा नंतर त्याने नियतीला जवळ बोलावलं आणि मांडीवर बसायला सांगितलं नियती लहान तिला काहीच कल्पना नव्हती की मामा च्या मनात काही वाईट असेल ती मांडीवर बसली तरीही गौरव विडिओ बघत होता नियतीला त्यातले काही कळले नाही ती तिच्या बाहुल्यांच्या सोबत खेळण्यात मग्न होती गौरवची कामवासना वाढली त्याने नियतीसोबत नराधम होऊन तिची अभ्रू हिरावून घेतली होती नियतीला काही कळेनासे झाले असह्य वेदनांनी थरकाप उडाला ती रडू लागली गौरवने तिचे कपडे नीट करून खाली जाण्यास सांगितले आणि धमकी दिली जर ह्या बद्दल आई बाबांना काही सांगितलं तर मी तुला संपवून टाकेन. नियतीला चालता येत नव्हतं, डोळ्यातील अश्रू पुसत ती खाली गेली रंजनाने विचारलं काय झालं बाळा रडतेस का? नियतीने नकारार्थी मान डोलावली तिच्या मनात भीती होती त्या रात्री ते सर्व घरी परतले पण नियतीच्या सोबत घडलेली ती घटना तिच्या डोळ्या समोरून जात नव्हती. आजवर ती ज्या व्यक्तीला मामा मामा करून त्याच्या खांद्यावर खेळली आज त्याच मामाने तिचा घात केला होता आणि नियती इतकी लहान होती की कुणाला काही समजून सांगू शकत नव्हती सहा वर्षाची पोर ती सांगेल तरी काय तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगबद्दल आठवूनसुद्धा अंगावर शहारे येत होते.

दुसऱ्या दिवशी नियतीला ताप आला तिची अंतर्वस्त्र काढताना रंजनाने पाहिलं की गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता. तिने नियतीला जवळ घेतलं तर तिला खूप ताप आला होता. तिला मूत्रविसर्जन करताना असह्य वेदना होत होत्या रंजनाला काही कळेना. पण तिला कळून चुकले होते की नियतीच्या सोबत काहीतरी चुकीचे घडले होते पण नक्की असे करणारं कोण तिने नियतीला खूप वेळा विचारले पण नियतीने कधी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. सर्वांना असेच वाटले की खेळताना काहीतरी लागले असेल पण तो सर्वांचा भ्रम होता डॉक्टर सुद्धा स्पष्ट करू शकले नाही कारण त्यांनी फक्त वरवरून तपासणी केली होती. असेच काही दिवस लोटत गेले आता नियतीला लैंगिक शिक्षणामुळे सर्व कळून चुकले होते की तिच्यासोबत जे घडले होते तो बलात्कार होता आणि समाजात बलात्कार झालेल्या स्त्रियांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं हे तिला कळून चुकलं होत म्हणून सर्व कळत असतानासुद्धा तिने कधीच या गोष्टीचा उलगडा नाही केला.

असेच दिवस लोटत गेले आता नियती वयात आली होती तिला एका मुलाबरोबर शिकत असताना प्रेम झाले काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु नियतीच्या मनात आजही तीच भीती होती की माझ्या सोबत घडलेली गोष्ट जर समाजात कळली तर माझ्यासोबत माझ्या आई वडिलांची समाजात असणारी संपूर्ण मानमर्यादा मातीमोल होईल म्हणून ती चुपचाप विषाचा घोट घेत होती. तिच्या मनात तिच्या असणाऱ्या मामाबद्दल तिरस्कार भरला होता आज तो मरण पावला होता पण तिला काडीमात्र फरक पडला नाही कारण ज्या व्यक्तीने एखाद्या मुलीच्या आयुष्यच उध्वस्त केलं असेल त्याला नक्कीच मरण यायला हवं. नियतीचे प्रेम खूपच वाढलं होतं पण तिला तिच्या आयुष्याची सुरुवात करायची होती पण पुरुषांची मानसिकता असते की जर मुलीमध्ये कौमार्य नसेल तर ती पवित्र नाही असा काहीसा भ्रम संपूर्ण भारतात आहे आपल्याला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे लग्नानंतर नियतीच्या आयुष्यात वादळ येऊ नये म्हणून तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगावंसं वाटलं परंतु नियतीच्या मनात शंकांचं उधाण आल होतं जर हे ऐकून त्यांनी मला सोडून दिल तर काय होईल? माझं प्रेम खर आहे परंतु... जस समाज पीडितेकडे पाहतो तसं पाहायला सुरुवात केली तर सर्व संपून जाईल?

अखेर नियतीने निर्णय घेतला होणाऱ्या पतीला संपूर्ण हकीकत सांगण्याचा पावसाळ्याचे दिवस होते तेवढ्या पावसात नियतीने होणाऱ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं अत्यंत महत्त्वाचे बोलायचं आहे येऊन भेटा... तिचा होणारा पती येऊन उभा होता १५ मिनिटे झाली पण नियतीच्या मुखातून शब्द निघेना ती घाबरली होती तिला तो प्रसंग डोळ्यासमोर येऊन ठेपला होता सांगू तरी कसं डोळ्यातून अश्रुधारा चालू झाल्या त्याला नक्की कळल नाही त्याने विचारलं नियती काय झालं? नियतीने नकारात्मक मान डोलावली पण अश्रू थांबत नव्हते त्याने तिला मिठीत घेऊन दोन्ही डोळ्यातील अश्रू पुसत विचारलं काय झालं सांगशील का? मी सांगेन पण तुम्ही आधी वचन द्या की मी जे सांगीन ते ऐकल्यावर मला सोडून जाणार नाही? तो सुद्धा क्षणभर गांगरला त्याला ऐकायचं होत नक्की कशामुळे नियती रडत आहे त्याने वचन दिले नाही जाणार! कधीच नाही जाणार श्वास असेपर्यंत साथ देईन असे बोलून तिच्या कपाळावर चुंबन घेतलं नियतीने हुंदका फोडत सुरुवात केली आणि घडलेला लहानपणीचा प्रसंग त्याला सांगून टाकला. मागील २० वर्षात नियती कुणालाच या प्रसंगाबद्दल सांगितले नव्हते तो आश्चर्यचकित झाला आणि नियतीला धीर देत म्हणाला अगं यात तुझी कुठे चूक होती का? त्या नराधमाच्या वासनेमुळे तुझे आयुष्य उध्वस्त झाले तू झेललेल्या असह्य वेदना त्यांना तू समोर गेलीस एवढं सगळं तू एकटीने सहन केलंस मग तुला अस का वाटलं की हे ऐकून मी तुझी साथ सोडून देईन जर हीच गोष्ट माझ्यासोबत घडली असती तर तू सुद्धा मला अर्ध्यावर टाकून गेली असतीस का? तिने नकारार्थी मान डोलावली आणि त्याला घट्ट मिठी मारली.


लवकरच दोघांचं लग्न झालं आणि त्यांनासुद्धा एक सुंदर गोड गोंडस मुलगी झाली तिचं नाव एलिझाबेथ ठेवलं आहे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे लहानपणापासून तिला लैंगिक शिक्षण देत आहेत. सध्या मुली स्वतःच्या घरातच सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यावर अत्याचार करणारे दुसरे कुणी नसून त्यांचे नातेवाईकच असतात म्हणून मुलांना लहान वयातच शिक्षण द्या. चांगला स्पर्श वाईट स्पर्श यातला फरक समजवा आणि लहान मुलींना किंवा मुलांना एकटे सोडू नका, नजरेआड होऊ देऊ नका. सर्वांनी काळजी घ्या. समाजात बरेच नराधम मोकाट आहेत. वेळेचा फायदा घेण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पीडित महिला ही स्वतःहून पीडित नसते समाजातील नराधम तिला पीडित बनवतात, ती शिकार होते समाजातील प्रत्येक पुरुषांच्या वाईट नजरेची. घरातून बाहेर पडली की तिला सतत स्वतःला सावरत राहावं लागतं आणि जर कधी नकळत शरीराचा एखादा भाग दिसला तर तिच्यावर वाईट संस्कार झालेत असा शिक्का मारला जातो. सर्वांनी आपापल्या परिवाराची काळजी घ्या. स्त्रियांना समजून घ्या, त्यांना आपलंसं करा, प्रेम द्या, तेव्हा प्रेम मिळेल...


©मितेश कदम


निसर्ग

चिमण्यांची चिवचिवाट
पाखरांची किलबिलाट

मंद वाहणारा वारा
झुळणारी झुडपे

निरभ्र निळसर आकाश
ते निळसर पाणी

सांयकाळचा मावळणारा सुर्य
रात्रीचा उगवणारा चंद्र

चांदण्याची लखलखाट
रात किड्यांची किर किर


©मितेश कदम


दहावीच वर्ष.....

आज दहावीच्या शिकवणीला सुरुवात झाली. दहावी म्हणजे सुट्ट्या कमी आणि अभ्यास जास्त असतो नववी ला होतो तर सगळे म्हणायचे हे खुप महत्त्वाचे वर्ष आहे हे निघालं की दहावी चे वर्ष अगदी सुरळीत जाते आणि दहावी ला कसाबसा आलो तर हे वर्ष आयुष्याची पहिली पायरी आहे असं सांगण्यात आलं हे वर्ष काढलं की बारावी उत्तम रित्या निघेल अस सांगण्यात येत आता खर काय नि खोटं काय परंतु शिक्षण ही काळजी गरज आहे हे तेवढं खर आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण घेतलं की हक्काची भाकर नेहमी मिळवू शकतो पण तशी साथ मिळाली की नक्कीच यशाचे शिखर गाठता येत यात गैर नाही.
नेहमी प्रमाणे शाळेत गेलो पण नवीन वर्गात गेलो की खोली बदलली असते पण मागचे संपूर्ण वर्ष त्या खोलीत घालवलेल्या आठवणी डोळ्या समोर असतात आणि खोली बदलण्याची इच्छा नसते पण नियम सर्वाना असतात मी खालीच वाट बघत होतो कुणी ओळखीचं दिसत का ????
आणि नेमका माझं नाव कानी पडलं .....

ए गण्या.........???????  दिनू ने हाक दिली
दिनू ......माझा  जिवलग मित्र माझीच वाट बघत होता त्याने तिसऱ्या मजल्यावरून आवाज दिला 
इथे वर वर बघ मी शोध घेत होतो आवाज कुठून येत आहे
तिसऱ्या मजल्यावरून दिनू आवाज देत होता मी तडक निघाली पायऱ्या कापत हापत हापत वर पोचलो 
भावा!!!!! कसा आहेस????
दिनू ने उत्तर दिले कसा दिसतोय मी ?????
कडक!!!!! मी उत्तर दिले....

नेहमी प्रमाणे शेवटचा बाक आमचा ठरलेलाच म्हणजे शिक्का मोर्तब केला होता आणि शाळेत असेच नियम असतात सभ्य मुलं पहिल्या बाकावर आणि आम्ही वळू शेवटच्या बाकावर 😉

शाळेचा पहिला क्लास वर्ग शिक्षकांचा बाकावर बसलेल्या मुलांच्या कडे बघत कुणी आल नाही याचे निरीक्षण करत वर्ग शिक्षिका बघत होत्या माझ्या कडे लक्ष देत म्हणाल्या
आलास का रे बाबा......??????
हो बाई तुम्हाला एकट टाकून कस जमेल.........
३ वर्ष झाले बाईंना सर्व मुलांचे स्वभाव चांगलेच परिचयाचे झाले होते त्यामुळे उलट उत्तर देणे हा मागील बाकावर बसलेल्या मुलांचा जन्मसिद्ध हक्कच जणू काही

हजेरी घेण्यासाठी बाई उठल्या पण त्या आधी नवीन वर्षाचे भाषण दरवर्षी प्रमाणे बाईंनी ऐकवायला सुरुवात केली आणि नाविनवर्षं आणि नवीन अटी आणि शर्ती सांगण्यास सुरुवात केली.....
दहावीचे वर्ष हे आयुष्याची पहिली पायरी असत त्यामुळे प्रत्येक मुलाने आपले भविष्य काय ठरवले आहे त्यावर अवलंबून आहे जेवढा जास्त अभ्यास करेल तोच यशाची किल्ली गाठेल हे आमच्या बाईंच नेहमीच वाक्य होत आणि जो विद्यार्थी उशिरा वर्गात येईल त्याला खाली बसवण्यात येईल वर्गपाठ आणि गृहपाठ नित्य नियमाने करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाईल अशी आशा दाखवली जायची दर वर्षी पण बक्षीस काही मिळाले नाही कोणत्याही विद्यार्थ्यांना पण तरीही मुलींची स्पर्धा सुरू होत सर्व तयारीला लागायचे  आणि आमचे शेवटचे दोन बाक हे नेहमी प्रमाणे शिक्षकांची टिंगल करण्यात अग्रेसर होते पण जेव्हा अभ्यास सुरू असेल तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यास हा आमचा सर्वांचा नियम

भाषण संपून सर्व शिक्षकांच्या पहिल्या दिवसाचा आरंभ झाला शाळेची घंटा झाली सर्व घराकडे निघाले मी दरवर्षी प्रमाणे सायकल वर शाळेत जात होतो या वर्षी दिनू च्या बाबांनी त्याला शाळेत जाण्यासाठी सायकल घेऊन दिली होती दिनू माझ्या शेजारच्या गावी रहात होता त्यामुळे घरी जाताना आम्ही दोघे सोबतच घरी निघायचो

घरी जाताना चर्चा रंगली अरे ती संजू किती फुगली बघितलिस का तू???? दिनू ने प्रश्न विचारला
हो रे !!!!! पण सुंदर दिसत होती आधी पेक्षा आज छान गजरा आणि गुलाबाचे फुल वेणी मध्ये कोंबून आली होती मी उत्तर दिले
अरे कोंबून नाही रे वेड्या!!!!!!!!दिनू मध्येच म्हणाला
त्याला मळणे अस म्हणतात 

मुलींना जन्मापासून सुंदर दिसण्याचा आजार असतो चेहरा काळा जरी असला तरी आरसा जणू काही त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांना बाकी कुणी दिसत नाही त्या आरश्या शिवाय एकट्याच आरश्या समोर बसून केस कुरवाळत असतात
@संजू माझं आणि वर्गातील प्रत्येक मुलाचं पहिलं प्रेमच जणू काही!!!
दिसायला गोरी गोरी पान , खाकी पावडर सुद्धा फिक्की दिसेल तिच्या समोर अस काही रूप तीच, मन मोहक असे डोळे थोडे निळसर कुणीही बघून प्रेमात पडेल नेहमी केसात गुलाबाचे फुल किंवा रात-राणीच्या फुलांचा0 गजरा मळून संपुर्ण वर्गात त्याचा सुगंध दरवळत असायचा वर्गात प्रवेश करताना जर नाकाला त्याचा सुगंध आला की समजून जायचं वर्गाची परी राणी अवतरली आहे तिला डोळेभरून बघण्याची ओढ असायची
तिच्या गजऱ्याचा एक वेगळा अर्थ सुद्धा होता तो काही सांगता येणार नाही मंडळी.... पण तुम्ही तो मला कळवू शकता
उत्तराची प्रतीक्षा असेल मला???

दहावीच्या वर्गात असताना घरी अभ्यास करता येत नसे सतत काहीतरी अडचण येत असायची माझी बुद्धी जशी बुरशी लागलेली तिचा कधी वापर झालाच नाही सगळं डोक्यावरून जात असायचं मग बाबांनी शिकवणी लावली शिकवणीचा खर्च उचलण्याइतपत आम्ही काही श्रीमंत नाही बाबा पिठाच्या गिरणीवर काम करायचे तेव्हा दोन आणे शेर पीठ मिळायचे आणि शिकवणी ची फी दोन रुपये इतकी आणि शिकवणी चे गुरुजी एकदम हिटलर सारखे त्यांना बघूनच सर्व मुलं घाबरून जायची दिसायला अगदी खुंखार रात्रीच्या स्वप्नात जरी आले तर सकाळी अंथरून ओल ओल झालेलं असायचं एक वेगळीच दहशत होती त्यांच्या आवाजात आणि शिकवणीला जाण्याची इच्छा नसायची पण योगा योगाने संजू सुद्धा तिथेच शिकवणी घेण्यासाठी येत असे.

शालेय शिक्षणात मी फारसा काही हुशार नव्हतो आणि चित्रलेत तर अगदीच भोपळा घेऊन येत आणि चित्रकलेचे गुरुजींनी मला भोपळा नावच ठेवले होते पण माझा मित्र दिनू नेहमी माझी समजूत काढायचा आणि माझं कौतुक करायचा मी नापास जरी झालो तरी दिनू मला हसवायचा आणि म्हणायचा अरे मी आहे ना तुझ्या जोडीला कशाला घाबरतो आणि खर म्हणजे हा दिनू खुप लबाड होता याने मला एकदा येऊन सांगितले की संजूला तू खुप आवडतोस आणि संजूला जाऊन सांगितले की गण्या ला तू खूप आवडते म्हणजे  दोघांच्या रेल्वे सुरू करून दिल्या दिनू ने पण आम्ही कधी हिम्मतच केली नाही एकमेकांना आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची आम्ही दिवस भर एकमेकांना डोळे भरून बघत असायचो कधी ती मला गपचूप बघत असायची आणि मी फळ्याकडे बघत गुरुजींना त्रास देत असायचो आणि कधी मी तिच्या कडे एकटक बघत असायचो जेव्हा तिला कळायचे तेव्हा एक झलक देत गोड असे स्मित हास्य करायची नकळत हळू हळू संपुर्ण वर्गातील मुलांना ही बातमी समजली पण शाळेतली मुलं शेवटी कधी सुधरणार्यातली नसतात हे माहीतच आहे त्यांनी लगेचच मला संजू च्या नावाने चिडवायला सुरुवात केली आणि संजू ला माझ्या नावाने त्यांना एक भलताच आनंद मिळत असावा पण मला ते सहन होत नव्हते माझा राग आवाक्याबाहेर जाऊ लागला आणि प्रेम वैगेरे काही नसतं फक्त आकर्षण असत हे स्वतःलाच समजावू लागलो परीक्षा तोंडावर होती आणि माझं लक्ष विचलित होत होते आणि त्याच काळात संजूने तिच्या प्रेमाचे पत्र आणून दिले मला काही कळेना संजू चांगल्या घरातली आणि मी मध्यम वर्गातील सुद्धा नाही मी तिच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार संपुर्ण आयुष्य कस काढणार या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर सापडलं की या सर्व गोष्टीला कुठे तरी आळा बसला पाहिजे मी ते पत्र न वाचताच संजू ला परत दिल आणि तिला समजावून सांगितलं आयुष्य खुप मोठ आहे क्षणिक आकर्षणाने आयुष्य खर्ची जाऊ नये म्हणून योग्य वेळेतच मार्ग बदलायला हवा आणि तो माझा आणि संजू च्या आयुष्यातील शेवटचा दिवस निघाला त्यानंतर संजू ने मला तिचा चेहरा कधी दाखवला नाही आणि मी सुद्धा तिचा चेहरा बघण्यासाठी कधी गेलो नाही हृदयात तिच्यासाठी खुप भावना होत्या पण त्यांचा नाईलाजाने अंत करावा लागला कदाचित तो चांगल्यासाठी सुद्धा असेल हरकत नाही 
जर आपल्या एखाद्या निर्णयाने समोरच्या व्यक्तीचे नुकसान टळत असेल तर तो निर्णय घेण्यात हरकत नाही आणि आपण सुद्धा कधी स्वार्थी विचार करू नये अशी माझी भावना आहे

लवकरच दहावीच्या परीक्षा कालावधी सुरू झाला मी अजून सुद्धा संजूच्या विचारातून बाहेर निघालो नाही मी तिला शरीराने लांब तर केले परंतु तिचे विचार अजूनही डोक्यात घर करून होते दिवस रात्र नजरे समोर तीच तीच आणि फक्त तीच त्या मुळे अभ्यासात काही लक्ष लागेना आणि अखेर परीक्षा सुरुवात झाली आणि योगा योगाने दिनू माझ्या पुढील बाकावर आला मला वाटलं जणू देव माझ्यावर प्रसन्न झालाच असावा पण त्या दिवशी मला दिनू चा खरा चेहरा जाणवला
मराठी चा पपेर आणि मानसिक त्रासाने वाचन काही लक्षात राहील नाही आणि प्रत्येक परीक्षेत असा एकही विद्यार्थी नसेल की त्याने रिकाम्या जागा स्वतः पाठ करून लिहल्या असतील रिकाम्या जागा विचारूनच लिहतात बहुतेक त्यातील मी सुद्धा एक
मी दिनू ला विचारलं दिनू उत्तरे सांग ना ?????
जर मी तुला उत्तरे सांगितली तर तू माझ्या पुढे जाशील आणि मला ते कदापि सहन होणार नाही स्वतः चा अभ्यास स्वतः कर आणि उत्तरे लिहून पास हो !!!!! दिनू ने उत्तर दिलं
मला हे उत्तर ऐकून जरा धक्काच बसला माझा जिवलग मित्र मला अशी उत्तरे देतो म्हणजे नक्कीच मी माणसे ओळखण्यात कुठे तरी चुकतो
त्यानंतर संपूर्ण परीक्षेत दिनू सोबत एकदाही बोलणे झाले नाही आणि दिनू ने दहावीच्या परीक्षेत ८०% मार्क मिळवले पण मी कुठे तरी कमी पडलो भरकटलो आणि ३९% मार्क घेऊन निराशेने घरी आलो तेव्हा मला कळून चुकले की.......

आयुष्यात आपले लक्ष विचलित करणारे खुप क्षण येतात आणि आपण त्यांच्या सोबत भरकटले जातो त्यामुळे आपल्या शैक्षणिक आणि पारिवारिक जीवनावर त्याचा ठसा उमटला जातो जो कधीही पुसता येणार नाही जणू असा काही आणि त्यामुळेच एकच ब्रीद वाक्य लक्षात ठेवावे ""एकटाजीव, सदाशिव""


©मितेश कदम

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

एक कल्पना



ती कशी असेल ही एक कल्पनाच आहे दररोजच एक कल्पना मनात येते कशी असेल!!!!!!!!!!

ती दररोज माझ्याशी बोलते पण बोलत असताना त्याच मन वेग वेगळ्या कल्पना रंगवत म्हणजे नक्की कस ते पुढे सांगतो

सुरुवात झाली बलिप्रतिपदा या दिवशी चाळीत एक पाहुनी मुलगी आली कळत नकळत दोघांनी एक मेकांना पाहिलं जास्त काही बोलणं झालं नाही पाहिल्याच क्षणी एकमेकांच्या नजरेला नजर भिडली आणि मग काय सुरू झाले एक नवीन पर्व!!!!!!!

एकमेकांचे नंबर तर घेतले पण पहिल्यांदा फोन करण्याचे धाडस कोण करणार ???
 असेच दिवस लोटत गेले. 

एके दिवशी एक फोन येतो समोरून अतिशय कोमळ असा आवाज येतो !!!!!!!!
कसा आहेस???????
मला नक्की कळलेच नाही नक्की कोण???
मी विचारले आपण कोण???
उत्तर आले तुझी मैत्रीण!!!!!!

विचारात मग्न असताना तिकडून प्रश्न आला विचार काय करतोस बोलणार आहेस की नाही????
नंतर ओळख पटली 🤣😂🤣😂

ती त्याला दररोज फोन करू लागली एकमेकांच्या आवडी निवडीची विचार पोस चालू झाली 
त्या दोघांच्या मध्ये खूपच साम्य होत जी गोष्ट मुलाला आवडते तीच गोष्ट मुलीला सुद्धा आवडायची दोघांच्या मध्ये या गोष्टीवरून खूप गप्पा रंगायच्या अगदी पायाच्या नखापासून तर केसा पर्यंत साम्यता निघायला लागली 

पण जेव्हा सर्व गोष्टी आपल्या मना सारख्या असल्या की त्या गोष्टीला किंमत राहत नाही हे खरं आहे
त्या मुलाला ती खुप आवडू लागली दोघांनी भेटण्याचे ठरवले
पण दोघांच्या मध्ये एकमत होत नव्हते नक्की भेटावे तरी कधी आणि मी कावरा बावरा होत चाललो होतो

खर म्हणजे आज काल मुली अस काय व्यसन लावतात मुलांना की मुले वेडी होऊन जातात त्यांच्या मागे माझे कोणत्याही मुलीचे मन दुखवण्याचा उद्देश नाही
कथा काल्पनिक आहे याचा कोणत्याही जिवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही असल्यास तो निव्वल योगा योग्य समजावा

मी तिला धमकवून भेटण्यास बोलावले आम्ही एका चहा घेण्यासाठी एका हॉटेलात गेले. तेव्हा मी तिला सांगितले की मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही आपण लग्न करूयात का????????

एवढं भावळेपणा मुलीने या आधी कधीच पहिला नव्हता तिने त्याला सांगितले की तू खुप घाई करतोस ईतकी घाई नको करुस आपले पूर्ण आयुष्य पडलंय हे वय आपलं मौज मजा करण्याचं आहे आणि मला इतक्यात लग्न नाही करायचं
मला खुप मोठा धक्का बसला त्याला नक्की कळेना की चाललंय काय?????
होतंय काय?????

मी तिला विचारलं की तू मस्करी करतेस ना माझी??????




तिने नकारार्थी मान हलवली
माझे हात पाय थंड पडले मला सुचेनासे झाले होते 
तिने माझी समजूत काढली की हे वय लग्न करण्याचे नाही तर एन्जॉय करायचे आहे या वयात एन्जॉय नाही करणार तर कधी एन्जॉय करणार
आम्ही दोघे चहा न घेताच बाहेर पडलो मला कळत नव्हते काय करू तरीही मी स्वतःला सावरत तेथून घरी आलो 
आई ने ओळखलं चेहरा पडला होता नक्की काहीतरी घडले होते पण मी आई ने काही विचारण्याच्या आधी घरातून बाहेर निघून गेलो बाहेर जाताच मित्राला फोन केला त्याने विचारलं
काय रे ???? आवाज असा का येतोय तुझा?????
मी... काही नाही भाऊ जरा टेन्शन मध्ये आहे
त्याने खुले आमंत्रण दिले चल मग तुझे टेन्शन कमी करण्याच्या ठिकाणी जाऊया
आम्ही निघालो मद्य प्राशन करायला 
इंद्र देव सुद्धा स्वर्गात सोमरस घेतात म्हणे आम्ही सुद्धा घेऊ एक एक प्याला
घरी गेल्यावर आई ला सुगधं येऊ नये म्हणून सुंगांधी वेलची हा एकमेव साधन बेवड्यांचा
घरी पोचल्यावर आई ला समजलेच शेवटी पोरगा दारू पिऊन आलाय म्हणून शेवटी आई ती तिनेच जन्म दिलाय तिला कळणार नाही असे होणारच नाही

दिवस लोटत गेले माझा आणि तिचा संपर्क संपत आला होता मला सावरायला वेळ लागला पण मी सावरेंन लवकरच पण ती कशी आहे याची कल्पना नव्हती जर प्रेम म्हणजे एन्जॉय असेल तर ती कल्पना नकोच असेल मला कायम स्वरूपी 
पण लवकरच माझ्या आयुष्याची ध्येय माझ्या समोर येऊन ठेपली मी पुन्हा मार्गस्थ झालो सध्या ती तिच्या आयुष्यात सुखी आहे 
आणि  ती कायम सुखात राहावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे 

कथा लिहण्याचे कारण वेगळेच पण एका जिवलग मैत्रिणीने आग्रह केल्याने कथा सादर करत आहे
तिचे नाव सांगणे महत्वाचे आहे नाहीतर एक चांगली मैत्रीण गमवावी लागेल तेजस्वि खंडाळे आपले खुप खुप धन्यवाद 

©मितेश कदम

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

निर्मळ प्रेम ...

रंग तुझा सावळा 
रूप तुझे मोहक

डोळे तुझे मोती
कंठ तुझे गाती

ओठ तुझे गादी
केस तुझे मखमली

नाक तुझे सुंदर
उच्छस्वास तुझा निर्मळ

स्पर्श तुझा कोमळ
हट्ट तुझा सोमळ

हरवुनी प्रेमात तुझ्या
रूप आहे निर्मळ

मितेश कदम



बुधवार, १५ जानेवारी, २०२०

मला एक बहीण हवी.......

नमस्कार मी बऱ्याच कथा पहिल्या वाचल्या त्यामध्ये हा विषय कधी मिळालाच नाही त्या मुळे आज बहिणीवर काही ओळी मांडण्याचा विचार आहे.


वेदांत लहानपना पासून तो एकटाच वाढला त्याच्या सोबत खेळायला कुणीच नसायचं तो सतत आई बाबांना म्हणायचा आई बाबा मला एक लहान बहीण द्याल का आणून???


त्याला कुणीतरी सांगितलेल असत की देव बाप्पा येतो आणि बहीण भाऊ देऊन जातो. तो लहानगा सतत देवाला सांगायचा की मला एक गोड गोंडस अशी बहीण दे पण कधी आई बाबांनी त्याच ऐकल नाही आणि कधी देव बाप्पा ने ही त्याच ऐकल नाही.


कालांतराने तो शाळेत जायला लागला शाळेत खुप साऱ्या मुले मुली असायचे पण त्याच्या मनात एकच खंत असायची की माझ्या शाळेतील सर्वाना एक भाऊ आणि बहीण आहेत मी एकटाच आहे. देवाने का मला एकट ठेवलं असेल की काहीतरी चुकीचं केलं की???



एके दिवशी तो संध्याकाळी शाळेतून घरी आला आणि देव घरात जाऊन मुसमुसत रडत होता आई ने पाहिलं की आपला वेदांत घरी आलाय वाटत पण आज मला आवाज न देता रडत का बसला आहे हे बघण्यासाठी ती देव घरात जाते?????


आई:- काय झालं बाळा??

वेदांत:- मला बहीण हवी माझ्या सोबत खेळायला मी एकटाच आहे देवाने मला एकट्याला का आणलं माझ्या सोबत एक बहीण पण आणायची होती ना त्याला समजत नाही का ????

आई:- अरे बाळा अस नाही काय तो देव बाप्पा खुप कामात असल्यामुळे तुला बहीण नाही आणू शकला मग त्यात रंगवण्याच कारण काय???

वेदांत:- शाळेतील मुलं बोलत होती की तू वाईट आहेस म्हणून तुला बहीण नाही दिली?????

आई :-अस काही नाही बाळा ते तुला मुद्दाम चिडवण्यासाठी तस बोलत होते तू जा बघू आधी फ्रेश हो मग तुझ्या आवडीचे लाडू देते मी तुला



तो तसाच पाय आपटत हात पाय धुवायला निघून गेला रात्री त्याचे बाबा आले तोवर वेदांत झोपला होता त्यांनी विचारलं काही खाल्लं का त्यांनी एवढ्या लवकर कसा काय झोपला आज तो

आई म्हणते त्याला बहीण हवी कुठून आणूया त्याला बहीण..........



मला एक बहीण हवी...................


प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत भांडणारी,

प्रत्येक रक्षाबंधन च्या दिवशी राखी बांधणारी,

त्याचे खुप खुप लाड करणारी,

प्रत्येक भांडणात आई बाबांना मध्ये आणणारी,

ती घरात नसेल तर घर मोकळं मोकळं वाटणारी,

स्वतःचा खाऊ खाऊन माझा खाऊ मागणारी,

आई नसताना आई च प्रेम देणारी,

आई च्या जेवणाची नक्कल करणारी,

देखणी नसली तरी सतत आरश्या समोर नटणारी,

सतत दादा दादा करणारी मला एक बहीण हवी.... होती


आज तो तरुण झालाय त्याला त्याच्या आई बाबांनी दत्तक घेतले होते हे त्याला वयात आल्यावर त्याच्या आई बाबांनी सांगितले

त्यावेळी जर एखादी मुलगी दत्तक घेतली असती तर तिच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च येऊ नये म्हणून त्यांनी मुलगा दत्तक घेतला कारण मुलगा आई वडिलांच्या म्हातारपणाचा आधार असतो आणि मुलगी हे ओझं असत म्हणून अनाथ मुलींना लवकर कोणीही दत्तक घेत नाही आजही खुप भेदभाव केला जातो मुला मुलींच्या मध्ये हे चित्र कधी बदलेल देव जाणे


पण त्याला नेहमी हीच खंत असायची मला सुद्धा एक बहीण हवी.......



पण आज वाटत की खरच मला बहीण नाही ते खुप बर आहे आज तर ती असती तर ती कितपत सुरक्षित असती समाजात काही कल्पना नाही याची पावला पावलावर नराधम उभे आहेत तिचा डोळ्यानेच बलात्कार करणारे नराधम आहेत शाळेत, कल्लासेस, ऑफिस, समाजात नुसते नराधम आहेत ती कुठेच सुरक्षित नाही. घरातून निघाल्यापासून तिला शाळेत, ऑफिसात जाई पर्यंत स्वताचे कपडे सांभाळावे लागतात. आणि नकळत शरीराचा एखादा भाग दिसला की लोक अशी बघतात की त्यांनी कधी हे चित्र पाहिलच नाही आणि त्यावरून मुलीवर वाईट संस्कार झालेत असे दोष लावले जातात.


जर प्रत्येक पुरुषाने हे जाणून घेतले पाहिजे की आपण दुसऱ्याच्या आई बहिणीवर वाईट नजरेने पाहतो त्याच नजरेने जर कोणी आपल्या आई बहिणी कडे पाहिलं तर तळ पायाची आग मस्तकात जाते तशीच आपण पाहणारी स्त्री सुद्धा कुणाची तरी आई आणि बहीण आहे


पुरुष कधी स्त्री किती त्रास सहन करते यावर विचार करीत नाही

महिन्यातील पाच दिवस म्हणजे ते नरक यातने पेक्षा कमी नसतात पुरुष त्यावरून सुद्धा त्यांची खिल्ली उडवतात पण ते त्यांनाच माहिती की किती त्रास होतो


गर्भ धारण झालेल्या स्त्री ला बघून आपण हसतो पण कधी विचार करावा की अडीच ते तीन किलोचा गोळा पोटात ९ महिने ९ दिवस तळ हातावरील भाजलेल्या फोडा सारखा जपावा लागतो अनुभव घ्यायचा असेल तर एक दिवस रात्र अडीच किलो चा गोळा पोटाला बांधून फिरावं तेव्हा नक्की कळेल की आपल्या आई ने ९ महिने ९ दिवस किती त्रास सहन केला असेल


छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त पायांची नखे बघून त्यांच्या मुखातून उदगार निघाले होते "" अशीच आमुची आई असती,

आम्ही सुद्धा इतकेच सुंदर झालो असतो""


मला देवाने सख्खी बहीण नाही दिली पण नकळत इतक्या गोड बहिणी दिल्या की त्यांची कधी कमी भासली नाही


कथा आवडली असल्यास नक्की टिप्पणी द्यावी ही विनंती

आणि ""प्रत्येक स्त्री चा मान हीच महाराष्ट्राची शान""

©मितेश कदम



सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

ती आणि मी पण.........

आठवणीतले चार दिवस
आज तुला पहिल्यांदा पाहिलं खुप खुश झालो तुला बघून
पहिल्यांदा नजरेला नजर भिडली तेव्हाच कळलं की आपल्यात काहीतरी आहे पण कधी वाटलं नव्हतं की अस आठवणीत ते शब्द ठेवावे लागतील


 मला नेहमी वाटायचं की मजल्यावर जो कोणी प्रेम करेल त्याला मी प्रेमा शिवाय खूप काही देईन पण कधी असा विचार नाही केला की मला सुद्धा प्रेमा  सोबत खूप काही मिळेल
पण या मध्ये एक गोष्ट राहिली तुम्हाला माहित आहे का ती???

या मध्ये खर प्रेम राहील एकमेकांना देणारे वादे राहिले आणि खर म्हणजे एकमेकांना दिलेली वचने राहिली जर एखादा व्यक्ती प्रेम करतो तर तो या सर्व गोष्टी करतो पण मी अस काही केलं नाही कारण हे सर्व घडण्या आधीच जर ती व्यक्ती माझ्या पासून लांब गेली असेल ते मी काय करणार त्यासाठी
आणि आपण कधी तेवढ्या लांबचा विचार नाही करत की कोण माझ्या जवळ राहणार आहे कोण नाही राहणार यावर आपण कधी विचार नाहीकरत मुळातच.




तो व्यक्ती जोवर आपल्या सोबत आहे तोवर आण त्याच्यासोबत प्रेमाने राहतो खरी गोष्ट तेव्हा कळते जेव्हा प्रसंग निर्माण होतो

आज ती माझ्या सोबत नाही परंतु ती जेव्हा सोबत होती तेव्हा कधी मी तिला दोष नाही दिला म आज तिला दोष देऊन काय प्राप्त होणार माणसाने आपल्या कडे जे आहे त्यात जास्त सुखी राहावं जे नाही त्याची खन्त करत बसण्यात निव्वल मूर्खपणा आहे



तिने आयुश्यात सुखी राहावं हीच प्रार्थना

धन्यवाद आपला अमूल्य वेळ देऊन कथा वाचली त्याबदसल आपले आभार

लवकरच येत आहे नवीन कथा घेऊन
आपला

मितेश कदम




प्रिय शिरीन....

प्रिय, शिरीन. विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???" प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत न...