गुरुवार, १६ जुलै, २०२०

प्रिय शिरीन....



प्रिय,
शिरीन.
विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???"

प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत नाही. पण यामुळे माझं प्रेम काही कमी झालं नाही आणि होणार ही नाही. मी आईला आणि बाबांची परवानगी मागितली आहे, आपल्या लग्ना बद्दल पण अजूनही त्यांनी होकार दिलेला नाही आहे. आज पुन्हा मी घरातील सर्व वरिष्ठ मंडळी सोबत माझ्या लग्नाचा विषय काढणार आहे. मला तुझ्या कडून शेवटचं उत्तर हवं आहे, की तू लग्नासाठी तयार आहेस की नाही.

शिरीन तुला आठवत असेल आपण काढलेले ते फोटो त्या मध्ये आपल्या मागील आठवणीतले फोटो बघत बसलो होतो. तुझ्या चेहऱ्यावरील ते हास्य आजही तसच डोळ्यात भरलेलं आहे. मला तुझ्या पासुन लांब जायचं नाही आहे. तु माझ्यासाठी तुझं घर सोडून येशील त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःच्या घराची तयारी करावी लागेल. त्यामुळे मी ज्यादा काम करत आहे जेणेकरून पैसे जमवून आपण स्वतः एक घर घेऊया ज्यामध्ये तु आणि मी आपलं सर्वस्वी जग असेल. मला कळत नाही की मी योग्य निर्णय घेत आहे की नाही कारण शिरीन मला तुझ्यापासून वेगळं होता येणार नाही. तुझ्या शिवाय आयुष्याच्या वाटेवर मी एकटा प्रवास करू शकत नाही कारण माझ्या जगण्याचं ध्येय तुच आहेस. पण मी माझ्या आई वडिलांना वृद्धापकाळात एकट्याला जगण्यासाठी सोडू शकत नाही माझ्याच नाही तर तुझ्या आई बाबांच्या साठी माझ्या मनात तितकाच आदर आणि प्रेम आहे. आणि जेव्हा त्यांना आपली गरज असेल तेव्हा आपण त्यांच्या सोबत नसणार हे योग्य वाटत नाही. म्हणुन तु तुझ्या आई वडिलांना माझ्या बद्दल कळव मी माझ्या आई वडिलांना तुझ्याबद्दल कळवतो.लवकरच उत्तर येईल अशी अपेक्षा करतो.

शिरीन आज पुन्हा तु दिलेल्या पत्रांच्या ढिगाऱ्यात पाहिले पत्र सापडले ती तारीख तो वार आणि तो क्षण जशास तसा डोळ्यासमोर उभा राहिला. तुला आठवत असेल कसा मी रेल्वे स्थानकावर तुझी वाट बघत उभा होतो. तुला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झाले होते. तु एक एक पायरी चढत येताना माझ्या हृदयाच्या ठोक्यानी जोर धरला होता. तु हळू हळू वर चढत येत होतीस, परंतु माझं हृदय त्याच्या चार पटीने जोरात धडकत होत. आजही तो अनुभव वेगळाच वाटतो. तुझ्या चेहऱ्यावर एक तेज होत. कदाचित ते मला पाहण्यासाठी असावं. त्यानंतर ट्रेन मध्ये तुझा हात हातात घेऊन चढताना आपलेपण वाटत होतं. ते सतत अनुभवावस वाटत. तुझं ते नाक मुरडन आजही आठवलं की चेहऱ्यावर खुदकन हसु येत. तुझ्या आणि माझ्या उंचीतील फरक जेव्हा तु मला दाखवत आणि माझ्या कडे वर तोंड करून बघत असायची तो क्षण मी माझ्या डोळ्यात भरून ठेवला आहे आणि कायमस्वरूपी तो माझ्या मनावर उमटून राहील. शिरीन आता हा दुरावा सहन होत नाही मला तुझ्या मिठीत मारायचं आहे.

आज पुन्हा त्या आठवणी जिवंत झाल्या. लवकरच तुला भेटायला येईन. तुझी खुशाली कळव. तु काळजी घे स्वतःची वेळेवर जेवत जा. आई बाबांना माझा नमस्कार कळव.

फक्त तुझा,
-मितेश


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रिय शिरीन....

प्रिय, शिरीन. विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???" प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत न...