काल्पनिक कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काल्पनिक कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ मे, २०२०

ती निर्भया...

आजवर लहान मुलींवर लहानपणी त्यांच्या आयुष्याचा खेळी केली जाते आणि ते कोणी बाहेरचे नाही तर घरातीलच नराधम असतात सध्या त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे विश्वासाने जगावं तरी कसं हा मोठा प्रश्न आज अशीच एका निर्भयाची कथा सतर्क राहण्यासाठी मांडत आहे कृपया याचा कथेचा वेगळा अर्थ काढू नये.  मुलगी म्हटलं की सर्व पुरुषांच्या नजरेत भरते ती सुंदर अशी कामुक स्त्री तीच स्त्री लहान असताना गोड गोंडस अशी गुबगुबीत परी अश्याच एका मुलीचा जन्म झाला सर्व परिवारात आनंदाच वातावरण होत तिच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुलगी झाल्यावर बर्फी वाटतात त्याने संपुर्ण इस्पितळात पेढे वाटले होते. खुपच सुंदर क्षण होता तो त्या आई साठी आणि त्या वडिलांच्या साठी. लवकरच तिचे बारसे झाले नाव नियती(काल्पनिक) ठेवण्यात आलं असे सुंदर नामकरण करण्यात आले हळू हळू नियती मोठी होत होती तिचे ते बोबडे बोलणे, तुरु तुरु चालणे एक नवलच असते. तिचा तिच्या वडिलांवर खूपच जीव होता आणि प्रत्येक मुलीचा तिच्या आई पेक्षा वडिलांवर खुप प्रेम असत करण प्रत्येक मुलगी तिच्या बाबांच्या साठी ही परी पेक्षा कमी नसते . नियती आता शाळेत जात होती तिला तिचे बाबा दररोज शाळेत सोडायला जायचे आणि आई रंजना (काल्पनिक) शाळेतून घरी आणायची.हा नित्याचा कार्यक्रम असायचा..


नियतीचे बाबा तिला प्रत्येक रविवारी बागेत खेळायला घेऊन जायचे. आज रविवार होता नियती सकाळ पासून बाबा उठा ना बागेत जायचं आहे किती वेळ झोपणार आज मला सुट्टी आहे शाळेला तुम्ही दर रविवारी असेच करता उशिरा उठता आणि मला संध्याकाळी बागेत घेऊन जाता मला खेळायला मिळतच नाही. शेवटी बाबा उठले त्यांच्या नियती चे ऐकून नियती तिच्या घरात जाऊन भांडी घेऊन आली खेळायला तोवर बाबा अंघोळीला निघून गेले बाबांना माहीत होतं खेळण्यात मग्न झाली की दुपार उलटून जाईल तोवर माझी कामे उरकून घेतो असेच काही घडले पण आज रंजनाच्या माहेरून फोन आला संध्याकाळी जेवायला या जावईबापू बाबांनी नक्की केलं आणि नियती ला
आवाज दिला
नियती मामाच्या घरी जायचं आहे !!!!
येणार ना????
नियतीने उत्तर दिले हो!!!!
बाबा टला जाऊया लगेच
आता नाही रे बाळा संध्याकाळी बाबांनी दिलेलं उत्तर बाबा मग आज बागेत नाही जायचं का????
नाही म्हणून बाबा निघून गेले अंघोळीला नियती पुन्हा खेळण्यात मग्न झाली बाबांनी आई ला सांगितले तुझ्या माहेरून फोन आला होता संध्याकाळी जेवायला या म्हणून आपल्याला जायचं आहे दुपारी निघुयात दुपार झाली नियती तयार झाली आणि आई च्या मागे लागली आई आवर ना ग पटकन मामाच्या घरी जायचय ना.... झालं ग बाई तुला नेहमी घाई असते बाबा चल ना रे हो बाळा कपडे तरी घालू दे मला बाबांनी उत्तर दिलं नियती रुसून बाहेर पायरी वर जाऊन बसली जेमतेम ६ वर्षांची गोरी गोरी पान , फुलांच्या सारखे मखमली गाल, डोळे निळसर घारे, डोक्यावर दोन पोनी बांधलेल्या,डोळ्यांवर केस येऊ नये म्हणून बँड लावलेला त्यावर सुंदर दोन फुलपाखरं बसलेली,खांद्याला पर्स अडकवलेली, जांभळा सफेद फ्रॉक, ओठांना गुलाबी रंगाची लिपस्टिक, कपाळाला सुंदर टिकली , आणि पावडर भरभरून लावलेली मुलींना लहानपणापासूनच सुंदर दिसण्याचा मोह असतो. लवकरच ते सर्व गाडीने निघाले नियती बाबांच्या पुढे बसली ती पर्स सतत खांद्यावरून पडत होती बाबांनी सांगितलं बाळा ती आई कडे दे ती ठेवेल जपून नको ना बाबा तरीही बाबांनी फी काढून रंजनाच्या हातात दिली थोड्याच वेळात ते रंजनाच्या माहेरी पोचले तिथे मुलगी आणि नात येणार म्हणून तयारी चालू होती जेवणाची नियती तिथे पोचल्या पोचल्या आज्जी ने उचलून घेतलं चार पाच मुके घेतले तेव्हा आज्जीला बर वाटल म्हातारी माणस नातवंडं बघून खुप आनंदी होतात एक वेगळाच मोह असतो.


बाबा, सासरे बुवा, रंजना आणि नियती जेवायला बसले जेवून झालं की सर्व गप्पा मारत बसले नियती ची बागेत खेळायची वेळ होती तिचे खेळ चालूच होते या घरातून त्या घरात हे समान काढ ते समान काढ नियती ला बाबा ओरडले काय ग कशाला समान काढतेस परत आणणार नाही तुला इकडे आणि कुठे नेणार सुद्धा नाही नियती रागात वरच्या खोलीत गेली तिथे गौरव बसला होता मोबाईलमध्ये अश्लील विडिओ बघत नियतीने आवाज दिला मामा... मी इथे खेळू का???? त्याने उत्तर दिले हो खेळ गौरव चा फाजिल पणा सुरूच होता तो एकटक विडिओ बघत होता तर एकटक नियतीला पाहत होता कुठे तरी त्याच्या मनातली काम वासना त्याला उनवत होती काही वेळा नंतर त्याने नियतीला जवळ बोलावलं आणि मांडीवर बसायला सांगितलं नियती लहान तिला काहीच कल्पना नव्हती की मामा च्या मनात काही वाईट असेल ती मांडीवर बसली तरीही गौरव विडिओ बघत होता नियतीला त्यातले काही कळले नाही ती तिच्या बाहुल्यांच्या सोबत खेळण्यात मग्न होती गौरवची कामवासना वाढली त्याने नियतीसोबत नराधम होऊन तिची अभ्रू हिरावून घेतली होती नियतीला काही कळेनासे झाले असह्य वेदनांनी थरकाप उडाला ती रडू लागली गौरवने तिचे कपडे नीट करून खाली जाण्यास सांगितले आणि धमकी दिली जर ह्या बद्दल आई बाबांना काही सांगितलं तर मी तुला संपवून टाकेन. नियतीला चालता येत नव्हतं, डोळ्यातील अश्रू पुसत ती खाली गेली रंजनाने विचारलं काय झालं बाळा रडतेस का? नियतीने नकारार्थी मान डोलावली तिच्या मनात भीती होती त्या रात्री ते सर्व घरी परतले पण नियतीच्या सोबत घडलेली ती घटना तिच्या डोळ्या समोरून जात नव्हती. आजवर ती ज्या व्यक्तीला मामा मामा करून त्याच्या खांद्यावर खेळली आज त्याच मामाने तिचा घात केला होता आणि नियती इतकी लहान होती की कुणाला काही समजून सांगू शकत नव्हती सहा वर्षाची पोर ती सांगेल तरी काय तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगबद्दल आठवूनसुद्धा अंगावर शहारे येत होते.

दुसऱ्या दिवशी नियतीला ताप आला तिची अंतर्वस्त्र काढताना रंजनाने पाहिलं की गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता. तिने नियतीला जवळ घेतलं तर तिला खूप ताप आला होता. तिला मूत्रविसर्जन करताना असह्य वेदना होत होत्या रंजनाला काही कळेना. पण तिला कळून चुकले होते की नियतीच्या सोबत काहीतरी चुकीचे घडले होते पण नक्की असे करणारं कोण तिने नियतीला खूप वेळा विचारले पण नियतीने कधी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. सर्वांना असेच वाटले की खेळताना काहीतरी लागले असेल पण तो सर्वांचा भ्रम होता डॉक्टर सुद्धा स्पष्ट करू शकले नाही कारण त्यांनी फक्त वरवरून तपासणी केली होती. असेच काही दिवस लोटत गेले आता नियतीला लैंगिक शिक्षणामुळे सर्व कळून चुकले होते की तिच्यासोबत जे घडले होते तो बलात्कार होता आणि समाजात बलात्कार झालेल्या स्त्रियांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं हे तिला कळून चुकलं होत म्हणून सर्व कळत असतानासुद्धा तिने कधीच या गोष्टीचा उलगडा नाही केला.

असेच दिवस लोटत गेले आता नियती वयात आली होती तिला एका मुलाबरोबर शिकत असताना प्रेम झाले काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु नियतीच्या मनात आजही तीच भीती होती की माझ्या सोबत घडलेली गोष्ट जर समाजात कळली तर माझ्यासोबत माझ्या आई वडिलांची समाजात असणारी संपूर्ण मानमर्यादा मातीमोल होईल म्हणून ती चुपचाप विषाचा घोट घेत होती. तिच्या मनात तिच्या असणाऱ्या मामाबद्दल तिरस्कार भरला होता आज तो मरण पावला होता पण तिला काडीमात्र फरक पडला नाही कारण ज्या व्यक्तीने एखाद्या मुलीच्या आयुष्यच उध्वस्त केलं असेल त्याला नक्कीच मरण यायला हवं. नियतीचे प्रेम खूपच वाढलं होतं पण तिला तिच्या आयुष्याची सुरुवात करायची होती पण पुरुषांची मानसिकता असते की जर मुलीमध्ये कौमार्य नसेल तर ती पवित्र नाही असा काहीसा भ्रम संपूर्ण भारतात आहे आपल्याला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे लग्नानंतर नियतीच्या आयुष्यात वादळ येऊ नये म्हणून तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगावंसं वाटलं परंतु नियतीच्या मनात शंकांचं उधाण आल होतं जर हे ऐकून त्यांनी मला सोडून दिल तर काय होईल? माझं प्रेम खर आहे परंतु... जस समाज पीडितेकडे पाहतो तसं पाहायला सुरुवात केली तर सर्व संपून जाईल?

अखेर नियतीने निर्णय घेतला होणाऱ्या पतीला संपूर्ण हकीकत सांगण्याचा पावसाळ्याचे दिवस होते तेवढ्या पावसात नियतीने होणाऱ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं अत्यंत महत्त्वाचे बोलायचं आहे येऊन भेटा... तिचा होणारा पती येऊन उभा होता १५ मिनिटे झाली पण नियतीच्या मुखातून शब्द निघेना ती घाबरली होती तिला तो प्रसंग डोळ्यासमोर येऊन ठेपला होता सांगू तरी कसं डोळ्यातून अश्रुधारा चालू झाल्या त्याला नक्की कळल नाही त्याने विचारलं नियती काय झालं? नियतीने नकारात्मक मान डोलावली पण अश्रू थांबत नव्हते त्याने तिला मिठीत घेऊन दोन्ही डोळ्यातील अश्रू पुसत विचारलं काय झालं सांगशील का? मी सांगेन पण तुम्ही आधी वचन द्या की मी जे सांगीन ते ऐकल्यावर मला सोडून जाणार नाही? तो सुद्धा क्षणभर गांगरला त्याला ऐकायचं होत नक्की कशामुळे नियती रडत आहे त्याने वचन दिले नाही जाणार! कधीच नाही जाणार श्वास असेपर्यंत साथ देईन असे बोलून तिच्या कपाळावर चुंबन घेतलं नियतीने हुंदका फोडत सुरुवात केली आणि घडलेला लहानपणीचा प्रसंग त्याला सांगून टाकला. मागील २० वर्षात नियती कुणालाच या प्रसंगाबद्दल सांगितले नव्हते तो आश्चर्यचकित झाला आणि नियतीला धीर देत म्हणाला अगं यात तुझी कुठे चूक होती का? त्या नराधमाच्या वासनेमुळे तुझे आयुष्य उध्वस्त झाले तू झेललेल्या असह्य वेदना त्यांना तू समोर गेलीस एवढं सगळं तू एकटीने सहन केलंस मग तुला अस का वाटलं की हे ऐकून मी तुझी साथ सोडून देईन जर हीच गोष्ट माझ्यासोबत घडली असती तर तू सुद्धा मला अर्ध्यावर टाकून गेली असतीस का? तिने नकारार्थी मान डोलावली आणि त्याला घट्ट मिठी मारली.


लवकरच दोघांचं लग्न झालं आणि त्यांनासुद्धा एक सुंदर गोड गोंडस मुलगी झाली तिचं नाव एलिझाबेथ ठेवलं आहे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे लहानपणापासून तिला लैंगिक शिक्षण देत आहेत. सध्या मुली स्वतःच्या घरातच सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यावर अत्याचार करणारे दुसरे कुणी नसून त्यांचे नातेवाईकच असतात म्हणून मुलांना लहान वयातच शिक्षण द्या. चांगला स्पर्श वाईट स्पर्श यातला फरक समजवा आणि लहान मुलींना किंवा मुलांना एकटे सोडू नका, नजरेआड होऊ देऊ नका. सर्वांनी काळजी घ्या. समाजात बरेच नराधम मोकाट आहेत. वेळेचा फायदा घेण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पीडित महिला ही स्वतःहून पीडित नसते समाजातील नराधम तिला पीडित बनवतात, ती शिकार होते समाजातील प्रत्येक पुरुषांच्या वाईट नजरेची. घरातून बाहेर पडली की तिला सतत स्वतःला सावरत राहावं लागतं आणि जर कधी नकळत शरीराचा एखादा भाग दिसला तर तिच्यावर वाईट संस्कार झालेत असा शिक्का मारला जातो. सर्वांनी आपापल्या परिवाराची काळजी घ्या. स्त्रियांना समजून घ्या, त्यांना आपलंसं करा, प्रेम द्या, तेव्हा प्रेम मिळेल...


©मितेश कदम


दहावीच वर्ष.....

आज दहावीच्या शिकवणीला सुरुवात झाली. दहावी म्हणजे सुट्ट्या कमी आणि अभ्यास जास्त असतो नववी ला होतो तर सगळे म्हणायचे हे खुप महत्त्वाचे वर्ष आहे हे निघालं की दहावी चे वर्ष अगदी सुरळीत जाते आणि दहावी ला कसाबसा आलो तर हे वर्ष आयुष्याची पहिली पायरी आहे असं सांगण्यात आलं हे वर्ष काढलं की बारावी उत्तम रित्या निघेल अस सांगण्यात येत आता खर काय नि खोटं काय परंतु शिक्षण ही काळजी गरज आहे हे तेवढं खर आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण घेतलं की हक्काची भाकर नेहमी मिळवू शकतो पण तशी साथ मिळाली की नक्कीच यशाचे शिखर गाठता येत यात गैर नाही.
नेहमी प्रमाणे शाळेत गेलो पण नवीन वर्गात गेलो की खोली बदलली असते पण मागचे संपूर्ण वर्ष त्या खोलीत घालवलेल्या आठवणी डोळ्या समोर असतात आणि खोली बदलण्याची इच्छा नसते पण नियम सर्वाना असतात मी खालीच वाट बघत होतो कुणी ओळखीचं दिसत का ????
आणि नेमका माझं नाव कानी पडलं .....

ए गण्या.........???????  दिनू ने हाक दिली
दिनू ......माझा  जिवलग मित्र माझीच वाट बघत होता त्याने तिसऱ्या मजल्यावरून आवाज दिला 
इथे वर वर बघ मी शोध घेत होतो आवाज कुठून येत आहे
तिसऱ्या मजल्यावरून दिनू आवाज देत होता मी तडक निघाली पायऱ्या कापत हापत हापत वर पोचलो 
भावा!!!!! कसा आहेस????
दिनू ने उत्तर दिले कसा दिसतोय मी ?????
कडक!!!!! मी उत्तर दिले....

नेहमी प्रमाणे शेवटचा बाक आमचा ठरलेलाच म्हणजे शिक्का मोर्तब केला होता आणि शाळेत असेच नियम असतात सभ्य मुलं पहिल्या बाकावर आणि आम्ही वळू शेवटच्या बाकावर 😉

शाळेचा पहिला क्लास वर्ग शिक्षकांचा बाकावर बसलेल्या मुलांच्या कडे बघत कुणी आल नाही याचे निरीक्षण करत वर्ग शिक्षिका बघत होत्या माझ्या कडे लक्ष देत म्हणाल्या
आलास का रे बाबा......??????
हो बाई तुम्हाला एकट टाकून कस जमेल.........
३ वर्ष झाले बाईंना सर्व मुलांचे स्वभाव चांगलेच परिचयाचे झाले होते त्यामुळे उलट उत्तर देणे हा मागील बाकावर बसलेल्या मुलांचा जन्मसिद्ध हक्कच जणू काही

हजेरी घेण्यासाठी बाई उठल्या पण त्या आधी नवीन वर्षाचे भाषण दरवर्षी प्रमाणे बाईंनी ऐकवायला सुरुवात केली आणि नाविनवर्षं आणि नवीन अटी आणि शर्ती सांगण्यास सुरुवात केली.....
दहावीचे वर्ष हे आयुष्याची पहिली पायरी असत त्यामुळे प्रत्येक मुलाने आपले भविष्य काय ठरवले आहे त्यावर अवलंबून आहे जेवढा जास्त अभ्यास करेल तोच यशाची किल्ली गाठेल हे आमच्या बाईंच नेहमीच वाक्य होत आणि जो विद्यार्थी उशिरा वर्गात येईल त्याला खाली बसवण्यात येईल वर्गपाठ आणि गृहपाठ नित्य नियमाने करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाईल अशी आशा दाखवली जायची दर वर्षी पण बक्षीस काही मिळाले नाही कोणत्याही विद्यार्थ्यांना पण तरीही मुलींची स्पर्धा सुरू होत सर्व तयारीला लागायचे  आणि आमचे शेवटचे दोन बाक हे नेहमी प्रमाणे शिक्षकांची टिंगल करण्यात अग्रेसर होते पण जेव्हा अभ्यास सुरू असेल तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यास हा आमचा सर्वांचा नियम

भाषण संपून सर्व शिक्षकांच्या पहिल्या दिवसाचा आरंभ झाला शाळेची घंटा झाली सर्व घराकडे निघाले मी दरवर्षी प्रमाणे सायकल वर शाळेत जात होतो या वर्षी दिनू च्या बाबांनी त्याला शाळेत जाण्यासाठी सायकल घेऊन दिली होती दिनू माझ्या शेजारच्या गावी रहात होता त्यामुळे घरी जाताना आम्ही दोघे सोबतच घरी निघायचो

घरी जाताना चर्चा रंगली अरे ती संजू किती फुगली बघितलिस का तू???? दिनू ने प्रश्न विचारला
हो रे !!!!! पण सुंदर दिसत होती आधी पेक्षा आज छान गजरा आणि गुलाबाचे फुल वेणी मध्ये कोंबून आली होती मी उत्तर दिले
अरे कोंबून नाही रे वेड्या!!!!!!!!दिनू मध्येच म्हणाला
त्याला मळणे अस म्हणतात 

मुलींना जन्मापासून सुंदर दिसण्याचा आजार असतो चेहरा काळा जरी असला तरी आरसा जणू काही त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांना बाकी कुणी दिसत नाही त्या आरश्या शिवाय एकट्याच आरश्या समोर बसून केस कुरवाळत असतात
@संजू माझं आणि वर्गातील प्रत्येक मुलाचं पहिलं प्रेमच जणू काही!!!
दिसायला गोरी गोरी पान , खाकी पावडर सुद्धा फिक्की दिसेल तिच्या समोर अस काही रूप तीच, मन मोहक असे डोळे थोडे निळसर कुणीही बघून प्रेमात पडेल नेहमी केसात गुलाबाचे फुल किंवा रात-राणीच्या फुलांचा0 गजरा मळून संपुर्ण वर्गात त्याचा सुगंध दरवळत असायचा वर्गात प्रवेश करताना जर नाकाला त्याचा सुगंध आला की समजून जायचं वर्गाची परी राणी अवतरली आहे तिला डोळेभरून बघण्याची ओढ असायची
तिच्या गजऱ्याचा एक वेगळा अर्थ सुद्धा होता तो काही सांगता येणार नाही मंडळी.... पण तुम्ही तो मला कळवू शकता
उत्तराची प्रतीक्षा असेल मला???

दहावीच्या वर्गात असताना घरी अभ्यास करता येत नसे सतत काहीतरी अडचण येत असायची माझी बुद्धी जशी बुरशी लागलेली तिचा कधी वापर झालाच नाही सगळं डोक्यावरून जात असायचं मग बाबांनी शिकवणी लावली शिकवणीचा खर्च उचलण्याइतपत आम्ही काही श्रीमंत नाही बाबा पिठाच्या गिरणीवर काम करायचे तेव्हा दोन आणे शेर पीठ मिळायचे आणि शिकवणी ची फी दोन रुपये इतकी आणि शिकवणी चे गुरुजी एकदम हिटलर सारखे त्यांना बघूनच सर्व मुलं घाबरून जायची दिसायला अगदी खुंखार रात्रीच्या स्वप्नात जरी आले तर सकाळी अंथरून ओल ओल झालेलं असायचं एक वेगळीच दहशत होती त्यांच्या आवाजात आणि शिकवणीला जाण्याची इच्छा नसायची पण योगा योगाने संजू सुद्धा तिथेच शिकवणी घेण्यासाठी येत असे.

शालेय शिक्षणात मी फारसा काही हुशार नव्हतो आणि चित्रलेत तर अगदीच भोपळा घेऊन येत आणि चित्रकलेचे गुरुजींनी मला भोपळा नावच ठेवले होते पण माझा मित्र दिनू नेहमी माझी समजूत काढायचा आणि माझं कौतुक करायचा मी नापास जरी झालो तरी दिनू मला हसवायचा आणि म्हणायचा अरे मी आहे ना तुझ्या जोडीला कशाला घाबरतो आणि खर म्हणजे हा दिनू खुप लबाड होता याने मला एकदा येऊन सांगितले की संजूला तू खुप आवडतोस आणि संजूला जाऊन सांगितले की गण्या ला तू खूप आवडते म्हणजे  दोघांच्या रेल्वे सुरू करून दिल्या दिनू ने पण आम्ही कधी हिम्मतच केली नाही एकमेकांना आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची आम्ही दिवस भर एकमेकांना डोळे भरून बघत असायचो कधी ती मला गपचूप बघत असायची आणि मी फळ्याकडे बघत गुरुजींना त्रास देत असायचो आणि कधी मी तिच्या कडे एकटक बघत असायचो जेव्हा तिला कळायचे तेव्हा एक झलक देत गोड असे स्मित हास्य करायची नकळत हळू हळू संपुर्ण वर्गातील मुलांना ही बातमी समजली पण शाळेतली मुलं शेवटी कधी सुधरणार्यातली नसतात हे माहीतच आहे त्यांनी लगेचच मला संजू च्या नावाने चिडवायला सुरुवात केली आणि संजू ला माझ्या नावाने त्यांना एक भलताच आनंद मिळत असावा पण मला ते सहन होत नव्हते माझा राग आवाक्याबाहेर जाऊ लागला आणि प्रेम वैगेरे काही नसतं फक्त आकर्षण असत हे स्वतःलाच समजावू लागलो परीक्षा तोंडावर होती आणि माझं लक्ष विचलित होत होते आणि त्याच काळात संजूने तिच्या प्रेमाचे पत्र आणून दिले मला काही कळेना संजू चांगल्या घरातली आणि मी मध्यम वर्गातील सुद्धा नाही मी तिच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार संपुर्ण आयुष्य कस काढणार या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर सापडलं की या सर्व गोष्टीला कुठे तरी आळा बसला पाहिजे मी ते पत्र न वाचताच संजू ला परत दिल आणि तिला समजावून सांगितलं आयुष्य खुप मोठ आहे क्षणिक आकर्षणाने आयुष्य खर्ची जाऊ नये म्हणून योग्य वेळेतच मार्ग बदलायला हवा आणि तो माझा आणि संजू च्या आयुष्यातील शेवटचा दिवस निघाला त्यानंतर संजू ने मला तिचा चेहरा कधी दाखवला नाही आणि मी सुद्धा तिचा चेहरा बघण्यासाठी कधी गेलो नाही हृदयात तिच्यासाठी खुप भावना होत्या पण त्यांचा नाईलाजाने अंत करावा लागला कदाचित तो चांगल्यासाठी सुद्धा असेल हरकत नाही 
जर आपल्या एखाद्या निर्णयाने समोरच्या व्यक्तीचे नुकसान टळत असेल तर तो निर्णय घेण्यात हरकत नाही आणि आपण सुद्धा कधी स्वार्थी विचार करू नये अशी माझी भावना आहे

लवकरच दहावीच्या परीक्षा कालावधी सुरू झाला मी अजून सुद्धा संजूच्या विचारातून बाहेर निघालो नाही मी तिला शरीराने लांब तर केले परंतु तिचे विचार अजूनही डोक्यात घर करून होते दिवस रात्र नजरे समोर तीच तीच आणि फक्त तीच त्या मुळे अभ्यासात काही लक्ष लागेना आणि अखेर परीक्षा सुरुवात झाली आणि योगा योगाने दिनू माझ्या पुढील बाकावर आला मला वाटलं जणू देव माझ्यावर प्रसन्न झालाच असावा पण त्या दिवशी मला दिनू चा खरा चेहरा जाणवला
मराठी चा पपेर आणि मानसिक त्रासाने वाचन काही लक्षात राहील नाही आणि प्रत्येक परीक्षेत असा एकही विद्यार्थी नसेल की त्याने रिकाम्या जागा स्वतः पाठ करून लिहल्या असतील रिकाम्या जागा विचारूनच लिहतात बहुतेक त्यातील मी सुद्धा एक
मी दिनू ला विचारलं दिनू उत्तरे सांग ना ?????
जर मी तुला उत्तरे सांगितली तर तू माझ्या पुढे जाशील आणि मला ते कदापि सहन होणार नाही स्वतः चा अभ्यास स्वतः कर आणि उत्तरे लिहून पास हो !!!!! दिनू ने उत्तर दिलं
मला हे उत्तर ऐकून जरा धक्काच बसला माझा जिवलग मित्र मला अशी उत्तरे देतो म्हणजे नक्कीच मी माणसे ओळखण्यात कुठे तरी चुकतो
त्यानंतर संपूर्ण परीक्षेत दिनू सोबत एकदाही बोलणे झाले नाही आणि दिनू ने दहावीच्या परीक्षेत ८०% मार्क मिळवले पण मी कुठे तरी कमी पडलो भरकटलो आणि ३९% मार्क घेऊन निराशेने घरी आलो तेव्हा मला कळून चुकले की.......

आयुष्यात आपले लक्ष विचलित करणारे खुप क्षण येतात आणि आपण त्यांच्या सोबत भरकटले जातो त्यामुळे आपल्या शैक्षणिक आणि पारिवारिक जीवनावर त्याचा ठसा उमटला जातो जो कधीही पुसता येणार नाही जणू असा काही आणि त्यामुळेच एकच ब्रीद वाक्य लक्षात ठेवावे ""एकटाजीव, सदाशिव""


©मितेश कदम

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

ती कुठे असेल.....

ती म्हटलं की आपल्या मनात खुप विचार तयार होतात. मी तिला शोधत होतो.कोण तरी म्हणाल की ती तुला शोधत असेल. पण खरं तर मी तिला शोधत होतो. कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये, लायब्रेरी मध्ये, कुठेच नाही सापडत म्हणून मी मैदानात एका झाडा खाली जाऊन एकटाच बडबडत होतो. तेवढ्यात ती आली म्हणाली कुठे होतास मी शोधत होते तुला मी विचारले कशा साठी तर तुला काहीतरी सांगायचं आहे असं तर तिने तिचा टेप चालू केला मी ऐकत होतो पण समजून गवत नव्हतो एक टक तिच्याकडे बघणं चालू होतं मध्ये मध्ये हा !!!! हो!!!! अस!!!!ठीक आहे!!!!! माझं बोलन होत

काही वेळाने तिच्या डोळ्यात पाणी आलं मला काहीच समजलं नाही ती काही न सांगता निघून गेली???????

क्लायमॅक्स समजलाच नसेल ना तुम्हाला काय चाललंय के बोलतोय काय सांगतोय काहीच
 नाही
चला तुम्हाला संपूर्ण स्टोरी सुरुवाती पासून सांगतो

दहावीची परीक्षा देऊन अकरावीत गेलो सर्व नवनवीन होत.आणि मी आवळी कसली चिंता नाही कसली फिकीर नाही काहीच फरक नव्हता पहिला दिवस कॉलेज चा आनंद अनावर झालेला.वर्गशिक्षक वर्गात आले तेव्हा चेहऱ्यावरचा रंग बदलला कारण ते इंग्लिश मध्ये बोलत होते आणि माझे इंग्रजी चे वांदे. तारुण्य मध्ये एक वेगळीच नशा असते. नवनवीन मैत्रिणी भेटणार या आशेने पण त्यात पण एक अपवाद माझा आणि मुलींचा ३६ चा आकडा कधीच कुणाशी पटलं नाही. आज पर्यंत म्हणजे १० वी पर्यंत मैत्रिणी समजून घायच्या पण कॉलेज ला गेल्यावर सर्व नवीन काहीच कळेना. शेवटच्या बाकावर १० वर्ष काढली म्हणजे या वर्षी सुद्धा शेवटचा बाक माझाच.
असेच दिवसावर दिवस निघून गेले. असेच एके दिवशी लोकल ट्रेन ने जाण्याचा योग आला पहाटे ६ वाजता एक मुलगी माझ्या समोरच्या फलाटावर उभी होती तिने मला पाहिलं मीही तिला पाहिलं पण काही वाटलं नाही. नंतर सतत लोकल ने प्रवास करत समजलं की ती माझ्याच कॉलेज ला आहे कारण नवनवीन असताना कॉलेज चा गणवेश नसायचा त्यामुळे इतकं लक्षात नाही आलं. काही दिवस लोटले मग मैत्रिणी कडून तिचे नाव कळले इंदिरा(काल्पनिक नाव) दिसायला सुंदर नव्हती पण माझ्यासाठी ती परी पेक्षा कमी नव्हती. तिची आठवण आली की एक स्मित हास्य येतच आजही. कालांतराने मी दररोजची गाठ भेट होत होती.मनातली भीती काढून एक दिवस ठरवला.

मंगळवार १८ ऑक्टोबर दिवाळी तोंडावर आली होती. तिला कसे विचारू हेच प्रश्न मनात चालू होते. दिवस रात्र एकच विचार कसे तिला सांगू. आदल्या रात्री ठामपणे विचार केला उद्या सकाळी मनातली गोष्ट तिला सांगणार. ठरल्याप्रमाणे सकाळी कॉलेज ला जाताना तिला विचारलं तिच्यासाठी हे नविनच होत सर्व माझ्या साठी सुद्धा नवीनच होत सर्व काही. मी ऐकून होतो असे काही केलं की पहिला कानाखाली खावी लागते त्या नंतर आई वडिलांना सामोरे जावे लागते.

तिला ट्रेन मध्ये गपचूप हळुवारपणे कानात सांगितले ""मला तू आवडतेस""" ती गालातल्या गालात हसली. पण थोड्याच वेळात तिच्या चेहऱ्यावर १२ वाजले. कॉलेज मध्ये पोचल्यावर ती तिच्या वर्गात मी माझ्या जाताना परत तिला आठवण करून दिली कॉलेज सुटल्यावर उत्तर दे. त्या वेळी स्मार्ट फोन नावाची गोष्ट नव्हती. नाहीतर तिला सांगितलं असत व्हाट्सअप ला मसेज कर तुझे उत्तर ☺️.

कॉलेज सुटले मी स्टेशन वर खुप वेळ वाट बघितली तिची पण ती आलीच नाही. मानत वेग वेगळे विचार चालू  झाले. काही सुचेनासे झाले होते . मीही तसाच निराशेने घरी गेलो आई ने विचारलं काय झालं बाळा उदास उदास का आहेस आजकाल काही प्रेम वैगेरे तर झालं नाही ना????
याला म्हणतात आई जिन्हे जन्म दिलाय तिच्या शिवाय आपल्या मुलाला कोणीही ओळखू शकत नाही अगदी खरं आहे आणि त्यातल्या त्यात माझी आई म्हणजे माझी मैत्रीण सगळ्यात जवळची मैत्रीण😘😘😘 मी टोलवा टोळवीची उत्तर देऊन निघून गेलो.

असेच दिवस निघून गेले माझी भीती दिवसेंदिवस वाढत चालली होती काही काळातच नव्हतं की आयुष्यात नक्की घडतंय काय??? आणि खर म्हणजे या वयात अश्या सर्व गोष्टी घडत असतात आता त्यास ""आकर्षण"" म्हणावे की ""प्रेम"" या गोष्टीवर मी कधी विचार केला नाही कारण मला ते हवं हवस वाटत होतं जग सांगत होत ते मिथ्य वाटत होतं मला. सर्व मित्र समजून सांगत होते विषय सोड त्या मुलीचा पण मला विश्वास होता आज नाही तरी उद्या ती मला भेटायला येईल.

बरोबर एक महिन्या नंतर मला ती पुन्हा स्टेशन ला दिसली तिने मला बघून मान फिरवली. मला कलेचं नाही की तिला झालं काय? मी तिला विचारलं की नक्की झालं काय??
मी तुला काहीतरी विचारलं यावर तुझं उत्तर काय आहे ते तरी  सांग ???
हो तर हो किंवा नाही तर नाही???
ती अबोल होती मला कळेना करण कधी मुलींच्या बाजूने विचारकरण्याचा अनुभव नव्हता.
काही वेळ असाच शांततेत गेला. काहीच वेळात मी पुन्हा त्याच प्रश्नावर आलो तर तिने उत्तर देणे नाकारलं 😢.
त्याच निराशे मध्ये मी कित्येक दिवस काढले . परंतु आशेची किरण होती माझ्या कडे पण कधी कधी वाटायचं की तिच्या मनात कुणी दुसर तर नसेल ना कारण मी सुद्धा दिसायला हिरो वैगेरे काहीही नव्हतो.

अखेर तो दिवस आला ३ महिन्यांनंतर तिने सुद्धा माझ्या कानात हळुवार पणे उत्तर दिले हो मला सुद्धा तू आवडतोय 💐💐💐 माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या वेळेस जो चेहऱ्यावर तेज आलं होतं कारण आयुष्यात पहिल्यांदा मला हवं ते मिळालं होतं.

आम्ही सुद्धा प्रेमी युगुलांसारखे भेटायला लागलो. कधी बागेत तर कधी कॉफी शॉप मध्ये, कधी मॉल मध्ये तर कधी सिनेमा घरात असे करत करत २ वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही.

पण तुम्हाला सुद्धा माहीत असेल आयुष्यात आण जेवढं सुखं उपभोगतो त्याची भरपाई दुखः सोसून भरावी लागते असेच काहीतरी माझ्या सोबत झाले.
काही दिवसात तिच्या घरी समजले की तिचं एका मुलावर प्रेम आहे . तिला नजर कैदेत ठेवणे चालू झाले. तरीही ती वेळ काढून मला फोन करायची आणि सर्व घरातील हालचालींचा आढावा द्यायची मला तर भीती वाटत होती की तीच कुठे तरी लग्न लावून देतील पण असं नाही झालं
तिने मला सांगितलं की तू माझ्या घरी मागणी टाक मी माझ्या बाबांना सर्व सांगितलं आहे.

त्यानंतर मी सुद्धा आई बाबांना सांगितलं की माझं एक मुलीवर प्रेम आहे ते सुद्धा हडबडले पण त्यांनी मान्य केलं.
मी माझ्या आई बाबांना घेऊन तिच्या घरी गेलो तेव्हा तिकडे वेगळंच चित्र पाहायला मिळालं ती तिथे न थांबता हळदी ला नाचण्यासाठी निघून गेली मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने उत्तर दिले की बाबा घरी आहेत तुम्ही बोलुन घ्या तुम्हाला योग्य वाटेल ते माझ्या मनात आधीच लाडू फुटू लागले🤣😂🤣
जर एखादी मुलगी आशा वेळी जर असे प्रतिउत्तर देत असेल तर नक्कीच अर्थ काहीही असू शकतो
त्यानंतर तिच्या घरी गेलो असता तिच्या आई वडिलांनी माझ्या आई वडिलांच्या पान उतारा केला. त्यांचं एकच वाक्य खूप वेगळच होत माझी मुलगी एकदा घातलेले कपडे पुन्हा पुन्हा घालत नाही. मला काहीच समजले नाही परंतु काही काळ विचार केल्यावर एक वाक्यात खूप मोठा अर्थ होता मला त्या नंतर हे समजले.
त्या दिवसानंतर मी तिच्याही संबंध तोडले परंतु आजही तिच्या प्रेमात जे अनुभव घेतले स्पष्ट पणे डोळ्यासमोर उभे राहतात.
त्यानंतर माझे काय झाले यावर स्पष्टीकरण देने महत्वाचे नाही.


आयुष्यात खुप मुली येतात आणि जातात सुद्धा त्यासाठी वेळ आणि आयुष्य कुणासाठी थांबत नाही
आपले आई वडील हे आपल्या प्रियकर आणि प्रियसी पेक्षा जास्त प्रेम करतात त्यांना सुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा असतात त्यांचा आदर करावा

(सदर कथा काल्पनिक आहे कोणत्याही वाक्तीशी कथेचा संबंध नाही ,असल्यास तो निवळ योगायोग आहे असे समजावे)

कारण जिथे मी तिथे तुम्ही

🙏🏻धन्यवाद🙏🏻

मितेश कदम




प्रिय शिरीन....

प्रिय, शिरीन. विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???" प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत न...