सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

कधी कधी वाटत पाण्यासारख जगावं.....

कधी कधी वाटते
पाण्यासारखे जगावे

कुणाचे न ऐकता
संथ वाहत रहावे

स्वतःसाठी नाही
दुसऱ्यासाठी जगावे

स्वतः चा मार्गने खळ खळ वहात रहावे
कधी कधी वाटते पाण्यासारखे जगावे

कुणासाठी साठी न जगता
एकटे राहायला शिकावे

मितेश कदम




शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

एक कॉफी ७००रु.

☕एक कॉफी ७००रु.☕

ऐकुन विचित्र वाटलं असेल तुम्हाला पण खरं आहे काही वर्षांपूर्वी मी कॅफे कॉफी डे मध्ये गेलो होतो. अत्यंत सुंदर वातावरण होत. आणि हो मी पाहिल्यांद्याच कॉफी पिण्याचा अनुभव होता एरवी मी टपरी शिवाय कॉफी पिली नव्हती. त्या मुळे मॉल मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि मुळात आमच्या मनात भीतीच असते की एवढ्या मोठ्या लोकांच्या सोबत आम्ही फिरू कसे शकतो

आदल्या दिवशी नवीन मैत्रिणी ला भेटायला जायचं या गोष्टीत गुंगलो होतो. पगाराचे दिवस नव्हते त्या मुळे सर्वांकडून उसने घेऊन मैत्रिणी ला भेटायला जाणार याच नवल नाही काही तेव्हा.
तो दिवस आठवतो अविसमरणीय क्षण होता तो आणि असेल सुद्धा आयुष्यात एवढा मोठा झटका मला पहिल्यांदाच भेटला होता.
मंगळवार ऑक्टोबर चा महिना होता माझं नवीन नवीन नात जुळलं होत. आम्ही आधी पासून मध्यम वर्गीय आई बाबांनी कधी मॉल किंवा आणखी काही ब्रँड अश्या गोष्टीशी ओळख करून दिली नव्हती. आणि लवकरच होणार होती.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे इंग्रजी चे वांधे आणि त्यातल्यात्यात मॉल मध्ये गेलं की तुमचं स्वागत इंग्रजी मध्ये केलं जातं. तसच काही माझं झालं आम्ही ट्रेन मधुन उतरल्यावर ठरलं की मॉल मध्ये जाऊयात पण मी कधी गेलो नाही असं तिला सांगितलं तिने मान हलवली आणि म्हणाली चालेल.
मी पुढे पुढे चालत होतो ती मागे मागे कारण तेव्हा हातात हात घालून चालायची हिम्मत नसायची.
कुणीतरी बघेल???
घरी समजेल???
लोक काय म्हणतील???
हीच प्रश्न मनात यायची. पण सध्या जग खुप पुढे गेलाय आणि मी मागे चाललोय. त्या आठवणी नक्की आज सोन्यासारख्या वाटतात.
आठवणीत जगण्याची एक वेगळीच नशा असते हे खरं आहे. आपण कधी दुःखी असलो की गोड आठवणी आठवल्या की कळत नकळतपणे चेहऱ्यावर एक हास्य येत खर सोन तेच असत अस मला तरी नक्की वाटत.

तसच पुढे गेल्यावर आम्ही कॅफे कॉफी डे मध्ये जाऊन बसलो. ती माझ्या समोरच बसली. बॅग मांडीवर घेऊन त्यात काहीतरी काढत असावी. मला कळलं ती पैशाचे पाकीट काढत होती. मी तिला सांगितले तुम्ही पैसे नका देऊ मी देतो फक्त तुम्ही ऑर्डर द्या करण मी आजवर कधी ऑर्डर दिली नाही कशी देतात हे सुद्धा माहीत नाही तुम्ही माझी तेवढी मदत कराल का असा प्रश्न मी तिला केला? तिने काहीच उत्तर दिलं नाही
असाच वेळ निघून चालला होता. अर्धा तास ती निमूटपणे बसली होती मी सुद्धा गपचूप तिला निरखत होतो तिचे हाव-भाव केसांवरून फिरणारा तिचा हात. सर्व गोष्टी निरखत होतो थोडा वेळ वाट बघितल्यावर मलाच राहवेना मी स्वतः उठून काउंटर कडे गेलो तिने एकदम गोड स्मित हास्य केलं. मला काही कळलंच नाही.


काउंटर वर पोचलो असता तिथे एक मुलगी उभी होती तिने प्रश्न केला
GOOD MORNING SIR
HOW CAN I HELP YOU SIR??
CAN YOU PLACED ORDER??????
😲😲😲😲😲😲😲😲😲
😟😟😟😟😟😟😟😟😟
माझ्या चेहऱ्यावरचा रंग बदलला मी म्हटलं ताई मला कॉफी पाहिजे तुम्ही द्याल का मला ???
तिने उत्तर दिलं हो सर
कोणती देऊ???
मी म्हटलं कोणतीही द्या तिने खुप सारी नाव सांगितली मला त्यातलं एकही समजलं नाही आजही आठवत नाही तिने किती सारी नाव घेतली होती बापरे!!!!!
मी तिला सांगितलं ताई कोणतीही द्या पण दोन द्या मी आणि माझी मैत्रीण आम्हा दोघांना दोन कॉफी द्या
तिने ऑर्डर घेतली तर खरी
५ ते ७ मिनिटे मी काउंटर वर उभाच होतो ती ताई आता बॉम्ब फोडणार होती तिने कॉम्पुटर मध्ये बटन दाबायला सुरुवात केली. मी तिच्या चेहऱ्याकडे बघत होतो तिचे बटन दाबून झाल्यावर मशीन मधुन बिल बाहेर आल
तिने सांगितलं सर १४००रु. बिल झालाय माझ्या पायाखालची जमीनच सरकली १४००रु. कॉफी एवढ्या पैशात मी एक वर्ष भर कॉफी पिली असती बाहेर पण इज्जत जाऊ नये म्हणून तिला १४००रु. दिले आणि गपचुप जाऊन बसलो. माझ्या मैत्रिणीने विचारलं सुद्धा नाही की काय झालं मी बिल हातात घेऊन त्या कडे बघतच होतो.
थोडा वेळ राहून तिनेच विचारलं काय झालं चेहऱ्यावर १२ का वाजलेत???
मी काहीही बोललो नाही तिच्या कडे बिल दिल आणि गप्प बसलो बिल बघताच तिच्या सुद्धा चेहऱ्यावर १२ वाजले तिने विचारलं इतकी महाग कॉफी ???
स्वस्त वाली घ्यायची ना????
मी उत्तर दिलं मला जर माहीत असत तर तुम्हाला बोललो असतो का तुम्ही जा म्हणून तुम्ही गेले नाहीत म्हणून मला १४००रु. ची कॉफी घ्याव्ही लागली.
थोड्या वेळातच ती ताई तिकडून हाका मारत होती माझं लक्षच नव्हतं तिने सांगितलं सर तुमची ऑर्डर इथे सेल्फ सर्विस आहे आम्ही सर्व्ह करत नाही.
मी रागातच उत्तर दिलं आम्हीच भेटतो ना तुम्हाला टिकली लावायला
आणि बघतो तर काय आमच्या कडे अंघोळीच्या मगा एवढा एक एक कप होता त्यात हार्ट काढलं होत आणि त्यात लव्ह लिहल होत. त्या सर्वांचे पैसे घेतले माझ्या कडून पण माझं ओझं जरा हलकं केलं होतं त्यांनी खर तर मी त्या साठीच आलो होतो पण सुरुवात कुठून करू हेच सुचत नव्हतं.


त्या नंतर मी एक सीप घेतला इतकी कडू कडू कॉफी होती की बस माझी कॉफी वरून इच्छा मेलीच तेव्हा साखर नव्हती त्या मध्ये म्हणून विचार करत होतो ती ताई विसरली असेल कदाचित.
मी त्या ताई ला विचारू की नको विचारू की नको असं करत करत शेवटी मी गेलोच नाही इज्जत जाईल म्हणून गप्प गुमान कडू कडू कॉफी काशी बशी पिली. पण माझी मैत्रीण रागावली होती कदाचित तिने एकही घोट घेतला नाही. मी तिला विनवणी केली की थोडं तरी पिया तुम्ही पण ती अडूनच होती.
शेवटी १४००रु. चा विचार करून ती सुदधा मीच पिली कॉफी कारण एवढे पैसे देऊन फेकून देण्या पेक्षा ती कॉफी पिलेली बरी हे मला तेव्हा योग्य वाटलं पण त्या वेळेस मला ऑर्डर देत आली असती तर तो क्षण अविसमरणीय झालाच नसता.

पण त्या दिवसानंतर मी पुन्हा कधी कॅफे कॉफी डे मध्ये गेलो नाही नंतर मला समजले की तिथे साखर वेगळीच मिळते हे मला नंतर कळाल. पण आपण नवीन असतो तेव्हा सर्व छान छान असत नंतर सर्व गोष्टी बदलत जातात

तुमच्या सोबत अस कधी घडलाय का????

घडलं असेल तर नक्की कळवा


मितेश कदम

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

आयुष्याच्या वाटेवरती......

आयुष्याच्या वाटेवरती साथ मला देशील का
या स्वार्थी जगा पासून दूर मला नेशील का

प्रेम हवे तुझे ते मला देशील का
नात तुझं माझं नाव त्याला देशील का

समुद्राच्या काठावर नाव माझं घेशील का
रात्रीची स्वने दिवसा पूर्ण करशील का

एकत्र येऊन समाजाला तोंड देशील का
स्वप्न सर्व तुझंच आहे तेच मला देशील का

आयुष्याच्या वाटे वरती एकटे मला सोडशील का
आयुष्याच्या वाटे वरती एकटे मला सोडशील का


©मितेश कदम

नदीशी नात ....

नदीशी नात
तुटलय आज
कारण मला
समुद्राशी जोडलंय आज

संथ वाहून वाहून
दमलोय आज
अथांग समुद्र
सजलाय आज

थंड हा वारा
रुसलाय आज
आभाळ सारा
हसलाय आज

मितेश कदम

म

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

ती कुठे असेल.....

ती म्हटलं की आपल्या मनात खुप विचार तयार होतात. मी तिला शोधत होतो.कोण तरी म्हणाल की ती तुला शोधत असेल. पण खरं तर मी तिला शोधत होतो. कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये, लायब्रेरी मध्ये, कुठेच नाही सापडत म्हणून मी मैदानात एका झाडा खाली जाऊन एकटाच बडबडत होतो. तेवढ्यात ती आली म्हणाली कुठे होतास मी शोधत होते तुला मी विचारले कशा साठी तर तुला काहीतरी सांगायचं आहे असं तर तिने तिचा टेप चालू केला मी ऐकत होतो पण समजून गवत नव्हतो एक टक तिच्याकडे बघणं चालू होतं मध्ये मध्ये हा !!!! हो!!!! अस!!!!ठीक आहे!!!!! माझं बोलन होत

काही वेळाने तिच्या डोळ्यात पाणी आलं मला काहीच समजलं नाही ती काही न सांगता निघून गेली???????

क्लायमॅक्स समजलाच नसेल ना तुम्हाला काय चाललंय के बोलतोय काय सांगतोय काहीच
 नाही
चला तुम्हाला संपूर्ण स्टोरी सुरुवाती पासून सांगतो

दहावीची परीक्षा देऊन अकरावीत गेलो सर्व नवनवीन होत.आणि मी आवळी कसली चिंता नाही कसली फिकीर नाही काहीच फरक नव्हता पहिला दिवस कॉलेज चा आनंद अनावर झालेला.वर्गशिक्षक वर्गात आले तेव्हा चेहऱ्यावरचा रंग बदलला कारण ते इंग्लिश मध्ये बोलत होते आणि माझे इंग्रजी चे वांदे. तारुण्य मध्ये एक वेगळीच नशा असते. नवनवीन मैत्रिणी भेटणार या आशेने पण त्यात पण एक अपवाद माझा आणि मुलींचा ३६ चा आकडा कधीच कुणाशी पटलं नाही. आज पर्यंत म्हणजे १० वी पर्यंत मैत्रिणी समजून घायच्या पण कॉलेज ला गेल्यावर सर्व नवीन काहीच कळेना. शेवटच्या बाकावर १० वर्ष काढली म्हणजे या वर्षी सुद्धा शेवटचा बाक माझाच.
असेच दिवसावर दिवस निघून गेले. असेच एके दिवशी लोकल ट्रेन ने जाण्याचा योग आला पहाटे ६ वाजता एक मुलगी माझ्या समोरच्या फलाटावर उभी होती तिने मला पाहिलं मीही तिला पाहिलं पण काही वाटलं नाही. नंतर सतत लोकल ने प्रवास करत समजलं की ती माझ्याच कॉलेज ला आहे कारण नवनवीन असताना कॉलेज चा गणवेश नसायचा त्यामुळे इतकं लक्षात नाही आलं. काही दिवस लोटले मग मैत्रिणी कडून तिचे नाव कळले इंदिरा(काल्पनिक नाव) दिसायला सुंदर नव्हती पण माझ्यासाठी ती परी पेक्षा कमी नव्हती. तिची आठवण आली की एक स्मित हास्य येतच आजही. कालांतराने मी दररोजची गाठ भेट होत होती.मनातली भीती काढून एक दिवस ठरवला.

मंगळवार १८ ऑक्टोबर दिवाळी तोंडावर आली होती. तिला कसे विचारू हेच प्रश्न मनात चालू होते. दिवस रात्र एकच विचार कसे तिला सांगू. आदल्या रात्री ठामपणे विचार केला उद्या सकाळी मनातली गोष्ट तिला सांगणार. ठरल्याप्रमाणे सकाळी कॉलेज ला जाताना तिला विचारलं तिच्यासाठी हे नविनच होत सर्व माझ्या साठी सुद्धा नवीनच होत सर्व काही. मी ऐकून होतो असे काही केलं की पहिला कानाखाली खावी लागते त्या नंतर आई वडिलांना सामोरे जावे लागते.

तिला ट्रेन मध्ये गपचूप हळुवारपणे कानात सांगितले ""मला तू आवडतेस""" ती गालातल्या गालात हसली. पण थोड्याच वेळात तिच्या चेहऱ्यावर १२ वाजले. कॉलेज मध्ये पोचल्यावर ती तिच्या वर्गात मी माझ्या जाताना परत तिला आठवण करून दिली कॉलेज सुटल्यावर उत्तर दे. त्या वेळी स्मार्ट फोन नावाची गोष्ट नव्हती. नाहीतर तिला सांगितलं असत व्हाट्सअप ला मसेज कर तुझे उत्तर ☺️.

कॉलेज सुटले मी स्टेशन वर खुप वेळ वाट बघितली तिची पण ती आलीच नाही. मानत वेग वेगळे विचार चालू  झाले. काही सुचेनासे झाले होते . मीही तसाच निराशेने घरी गेलो आई ने विचारलं काय झालं बाळा उदास उदास का आहेस आजकाल काही प्रेम वैगेरे तर झालं नाही ना????
याला म्हणतात आई जिन्हे जन्म दिलाय तिच्या शिवाय आपल्या मुलाला कोणीही ओळखू शकत नाही अगदी खरं आहे आणि त्यातल्या त्यात माझी आई म्हणजे माझी मैत्रीण सगळ्यात जवळची मैत्रीण😘😘😘 मी टोलवा टोळवीची उत्तर देऊन निघून गेलो.

असेच दिवस निघून गेले माझी भीती दिवसेंदिवस वाढत चालली होती काही काळातच नव्हतं की आयुष्यात नक्की घडतंय काय??? आणि खर म्हणजे या वयात अश्या सर्व गोष्टी घडत असतात आता त्यास ""आकर्षण"" म्हणावे की ""प्रेम"" या गोष्टीवर मी कधी विचार केला नाही कारण मला ते हवं हवस वाटत होतं जग सांगत होत ते मिथ्य वाटत होतं मला. सर्व मित्र समजून सांगत होते विषय सोड त्या मुलीचा पण मला विश्वास होता आज नाही तरी उद्या ती मला भेटायला येईल.

बरोबर एक महिन्या नंतर मला ती पुन्हा स्टेशन ला दिसली तिने मला बघून मान फिरवली. मला कलेचं नाही की तिला झालं काय? मी तिला विचारलं की नक्की झालं काय??
मी तुला काहीतरी विचारलं यावर तुझं उत्तर काय आहे ते तरी  सांग ???
हो तर हो किंवा नाही तर नाही???
ती अबोल होती मला कळेना करण कधी मुलींच्या बाजूने विचारकरण्याचा अनुभव नव्हता.
काही वेळ असाच शांततेत गेला. काहीच वेळात मी पुन्हा त्याच प्रश्नावर आलो तर तिने उत्तर देणे नाकारलं 😢.
त्याच निराशे मध्ये मी कित्येक दिवस काढले . परंतु आशेची किरण होती माझ्या कडे पण कधी कधी वाटायचं की तिच्या मनात कुणी दुसर तर नसेल ना कारण मी सुद्धा दिसायला हिरो वैगेरे काहीही नव्हतो.

अखेर तो दिवस आला ३ महिन्यांनंतर तिने सुद्धा माझ्या कानात हळुवार पणे उत्तर दिले हो मला सुद्धा तू आवडतोय 💐💐💐 माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या वेळेस जो चेहऱ्यावर तेज आलं होतं कारण आयुष्यात पहिल्यांदा मला हवं ते मिळालं होतं.

आम्ही सुद्धा प्रेमी युगुलांसारखे भेटायला लागलो. कधी बागेत तर कधी कॉफी शॉप मध्ये, कधी मॉल मध्ये तर कधी सिनेमा घरात असे करत करत २ वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही.

पण तुम्हाला सुद्धा माहीत असेल आयुष्यात आण जेवढं सुखं उपभोगतो त्याची भरपाई दुखः सोसून भरावी लागते असेच काहीतरी माझ्या सोबत झाले.
काही दिवसात तिच्या घरी समजले की तिचं एका मुलावर प्रेम आहे . तिला नजर कैदेत ठेवणे चालू झाले. तरीही ती वेळ काढून मला फोन करायची आणि सर्व घरातील हालचालींचा आढावा द्यायची मला तर भीती वाटत होती की तीच कुठे तरी लग्न लावून देतील पण असं नाही झालं
तिने मला सांगितलं की तू माझ्या घरी मागणी टाक मी माझ्या बाबांना सर्व सांगितलं आहे.

त्यानंतर मी सुद्धा आई बाबांना सांगितलं की माझं एक मुलीवर प्रेम आहे ते सुद्धा हडबडले पण त्यांनी मान्य केलं.
मी माझ्या आई बाबांना घेऊन तिच्या घरी गेलो तेव्हा तिकडे वेगळंच चित्र पाहायला मिळालं ती तिथे न थांबता हळदी ला नाचण्यासाठी निघून गेली मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने उत्तर दिले की बाबा घरी आहेत तुम्ही बोलुन घ्या तुम्हाला योग्य वाटेल ते माझ्या मनात आधीच लाडू फुटू लागले🤣😂🤣
जर एखादी मुलगी आशा वेळी जर असे प्रतिउत्तर देत असेल तर नक्कीच अर्थ काहीही असू शकतो
त्यानंतर तिच्या घरी गेलो असता तिच्या आई वडिलांनी माझ्या आई वडिलांच्या पान उतारा केला. त्यांचं एकच वाक्य खूप वेगळच होत माझी मुलगी एकदा घातलेले कपडे पुन्हा पुन्हा घालत नाही. मला काहीच समजले नाही परंतु काही काळ विचार केल्यावर एक वाक्यात खूप मोठा अर्थ होता मला त्या नंतर हे समजले.
त्या दिवसानंतर मी तिच्याही संबंध तोडले परंतु आजही तिच्या प्रेमात जे अनुभव घेतले स्पष्ट पणे डोळ्यासमोर उभे राहतात.
त्यानंतर माझे काय झाले यावर स्पष्टीकरण देने महत्वाचे नाही.


आयुष्यात खुप मुली येतात आणि जातात सुद्धा त्यासाठी वेळ आणि आयुष्य कुणासाठी थांबत नाही
आपले आई वडील हे आपल्या प्रियकर आणि प्रियसी पेक्षा जास्त प्रेम करतात त्यांना सुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा असतात त्यांचा आदर करावा

(सदर कथा काल्पनिक आहे कोणत्याही वाक्तीशी कथेचा संबंध नाही ,असल्यास तो निवळ योगायोग आहे असे समजावे)

कारण जिथे मी तिथे तुम्ही

🙏🏻धन्यवाद🙏🏻

मितेश कदम




शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

अजून किती दिवस???

कधी रात्र तर कधी दिवस
प्रेम म्हणते अजून किती दिवस?

काळजीत तुझ्या मन माझे निरागस
प्रेम म्हणते अजून किती दिवस?

समुद्राच्या लाटा जशा उसळती
काठ म्हणतो अजून कती दिवस?


प्रेम म्हणते अजून काही दिवस 
प्रेम म्हणते अजून काही दिवस



मितेश कदम

निराशेचे वारे

अंधाराच्या सोबतीला चन्द्र तारे
प्रकाशाच्या सोबतीला सुर्य वारे

पाखरांच्या सोबतीला झुळझुळणारी फुले
प्राण्यांच्या सोबतीला हिरवळ झाडे

प्रेमाच्या सोबतीला निराशेचे वारे




मितेश कदम



मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

स्वप्न पाहावे मृत्यूचे

स्वप्न पाहावे मृत्यूचे
जगण्यात काही अर्थ नव्हे
नाम घ्यावे भगवंताचे
वेड्या माणसा तुझ्यात काय नव्हे



-©मितेश कदम

प्रिय शिरीन....

प्रिय, शिरीन. विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???" प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत न...